सुरगाणा : समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित वसतिगृह कर्मचारीना गेल्या तेरा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने या सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने लवकरात लवकर थकलेले संपूर्ण मानधन एक रकमी देऊन होत असलेली आर्थिक अडवणूक दूर करावी अशी या कर्मचारीकडून मागणी केली जात असून, त्याकडे मात्र संबंधिताकडून दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात समाज कल्याण विभागामार्फत अनुदानित वसतिगृह चालविले जातात. यामध्ये अधीक्षक यांना आठ हजार, स्वयंपाकी सहा हजार, पहारेकरी पाच हजार व मदतनीस पाच हजार याप्रमाणे मानधन मिळते. सध्या मिळणारे मानधन हे तुटपुंज असून, त्यातच हे मानधन गेल्या तेरा महिन्यापांसून अनेक वेळा मागणी करूनही अद्यापपर्यंत मिळालेले नाही. पगार न मिळाल्याने त्यांना कौटुंबिक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वसतिगृह कर्मचारी मानधना पासून वंचित
By admin | Published: February 02, 2015 12:26 AM