लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : चेन्नई येथील एस़आऱएम युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून इंदिरानगरमधील महिलेस दीड लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.इंदिरानगर येथील नीता बाळासाहेब आचारी (रा.पार्क साइट रेसिडेन्सी, वडाळा पाथर्डीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाने चेन्नई येथील एस़आऱएम युनिर्व्हसिटी येथे प्रवेश घेतला आहे. मुलाला तेथे राहण्याच्या व्यवस्थेसाठी आचारी कुटुंबीयांनी गुगलवर युनिर्व्हसिटीची माहिती घेतली असता तेथे ९१७६४९६०६५ हा क्रमांक टाकलेला होता़ या क्रमांकावर संपर्क साधला असता सुमित कुमार या व्यक्तीने त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची मागणी करून आॅनलाइन पैसे बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले़ त्यानुसार आॅनलाइन पैसे वर्ग केल्यानंतर त्यांनी कॉलजेच्या प्राचार्यांकडे चौकशी केल्यानंतर अशा नावाचा कर्मचारी नसल्याचे सांगितले़वसतिगृह प्रवेशाच्या नावाखाली आपली दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आचारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़
वसतिगृहाच्या प्रवेशाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 5:29 PM