कोट -
शहरातील चार ते पाच हॉटेलच्या पोळी-भाकरीचे काम असलेल्या व्यावसायिकाकडे मी काम करत होते. मागील वर्षापासून त्यांच्या ऑर्डर कमी झाल्याने मला काम मिळत नाही. यामुळे घरखर्च चालविणे कठीण झाले असून, आता मिळेल ते काम करावे लागत आहे.
- कुंदाबाई पगारे
कोट -
हॉटेलमध्ये काम करत असताना रोजच्या रोज पगार मिळत होता त्यामुळे घरखर्च चालविणे सोपे होते, पण हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याने आमचे काम बंद झाले आहे. आता कुटुंब कसे चालवायचे याची विवंचना लागली आहे.
- मंगला पवार
कोट-
घरीच पोळी, भाकरी करून ते हॉटेलला पुरविण्याचा माझा व्यावसाय आहे. यामुळे पतीलाही हातभार लागतो. मागील काही महिन्यांपासून हॉटेलकडून मिळणाऱ्या ऑर्डर एकदमच कमी झाल्या आहेत. यामुळे आता आर्थिक ओढाताण वाढली आहे. मुलांच्या शाळेचा खर्च आणि इतर घरखर्च भागविताना कसरत करावी लागते.
- सविता बनसोडे
चौकट -
कोरोनामुळे पतीचा रोजगार बंद झाला. त्यात आमचे काम गेल्याने वर्षभर आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. आता कुठे गाडी रुळावर येऊ लागली असताना, शासनाने पुन्हा हॉटेल बंद केल्याने आता खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील एकूण हॉटेल - १,५००
पोळी, भाकरी करणाऱ्या महिलांची संख्या - ६,०००