नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आव्हान दिले. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांनी नाशिककर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.सोनसाखळी चोरीच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवामध्ये अशोका मार्ग, रविशंकर मार्गसह आदी परिसरांत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. तसेच आगामी नवरात्रोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असताना शहरात सोनसाखळी चोरीच्या तासाभरात सहा घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सर्वत्र पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये नाकाबंदी केली जात असूनही एकही सोनसाखळी चोर पोलिसांना गळाला लागलेला नाही हे विशेष! आजच्या घटनांमध्ये प्रत्यक्षदर्शी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार सोनसाखळीचोर दुचाकीवरून हेल्मेट परिधान करत आले आणि सोनसाखळी गळ्यातून हिसकावून पळ काढला. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी तपोवनरोडवर घडली. शकुंतला पाटील (५३) या पायी जात असताना दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी येऊन त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली त्यावेळी झाडीची फुले तोडत होत्या. एक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे; मात्र पोलिसांकडे याची कुठलीही माहिती नाही.
५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही एका तासात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या; एकही चोरटा गळाला लागला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 9:58 PM
नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आव्हान दिले. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांनी नाशिककर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.सोनसाखळी चोरीच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. ...
ठळक मुद्देसोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून पोलिसांना आव्हानकायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार सोनसाखळी चोरीच्या घटना