येवला : शहरासह तालुक्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी आरोग्य विभाग विशेष मोहीम राबवत आहे. शहरात घरोघरी आरोग्य तपासणी केली जात असतांना, तालुक्यातील ग्रामीण भागातही आता घरोघरी पाहणी करून आरोग्य तपासणी केली जात आहे.तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या आरोग्यकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच मोठ्या गावांत प्रथम घरोघरी जावून पाहणी व आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहीमेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आयआर थर्मामीटर व पल्स आॅक्सीमीटर उपलब्ध करून दिले गेले आहे. या मोहिमेत तालुक्यातील राजापूर, नगरसूल, अंदरसूल, मुखेड, सावरगाव, पाटोदा या गावांमध्ये सध्या पाहणी व आरोग्य तपासणी सुरू आहे.सदर मोहिमेत सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून पुढील काही दिवस प्रत्येक आठवड्यात दोन दिवस नियमति माहिती घेवून तपासणी केली जात आहे. तसेच साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध तसेच दमा, मधुमेह, थायरॉईड, किडनी, अस्थमा, कॅन्सर, बायपास यासारखे इतर दुर्धर आजाराने ग्रस्त असणाºया रूग्णांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पुढील काही दिवस नोंदी ठेवल्या जात आहेत. आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक-सेवीका यांच्या माध्यमातून सदर पाहणी व तपासणी सुरू असून मोठी गावे झाल्यानंतर इतर गावांचा देखील अशाच पध्दतीने पाहणी व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण तालुक्याचीच पाहणी व आरोग्य तपासणी करून त्यातून आढळून येणार्?या संशयीत व इतर दुर्धर रूग्णांना औषधोपचार व प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी दिली जाणार असल्याचे तालुका ग्रामीण कोरोना नोडल आॅफिसर डॉ. शरद कातकडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही घरोघर पाहणी अन् आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 1:33 PM