नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धतीने नमाज, कुराण धर्मग्रंथाचे आबालवृद्धांनी पठण करत कोरोनासारख्या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ‘दुवा’ मागितली. शासनाच्या निर्बंधांचे पालन करत कुठल्याही मशिदींमध्ये सामूहिक सोहळा पार पडला नाही.धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या ‘शब ए कद्र’ची मोठी रात्र शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. मशिदींवर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प आदी भागातील मशिदींना रोशणाईने झळाळी प्राप्त झाल्याचे चित्र होते.दरम्यान, या रात्रीच्या औचित्यावर विविध भागांमध्ये शाळकरी चिमूकल्यांनीसुद्धा निर्जळी कडक उपवास केला.दरवर्षी रमजान पर्वाचा २६वा उपवास सोडल्यानंतर शब ए कद्र साजरी केली जाते. या रात्रीच्या औचित्यावर मशिदींमधून विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम होतात. समाजबांधव एकत्रितपणे कुराण पठण करतात आणि अल्लाहच्या दरबारी दुवा मागतात. तसेच मशिदीचे मौलवी, सेवेकरी (खादीम) यांचा विश्वस्तांकडून सत्कार केला जातो. कोरोनाचे सावट असल्याने हा सोहळा यंदाही कोणत्याही मशिदीत पार पडला नाही. धर्मगुरूंचे प्रवचनही झाले नाही.या रात्रीत धर्मग्रंथ कुराण पृथ्वीतलावर अवतरीत करण्यात आल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या रात्रीवर कोरोनाचे सावट राहिले. कोरोनाच्या साथीमुळे शासनाच्या वतीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कडक निर्बंधांमुळे या विशेष रात्रीलाही मशिदींमध्ये नमाजपठण झाले नसल्याचे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सांगितले.
कोरोनाच्या उच्चाटनासाठी घरोघरी ‘दुवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 1:48 AM
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धतीने नमाज, कुराण धर्मग्रंथाचे आबालवृद्धांनी पठण करत कोरोनासारख्या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ‘दुवा’ मागितली. शासनाच्या निर्बंधांचे पालन करत कुठल्याही मशिदींमध्ये सामूहिक सोहळा पार पडला नाही.
ठळक मुद्दे‘शब ए कद्र’ : समाजबांधवांकडून घरांमध्ये नमाज अन कुराण पठण