शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

घरपट्टीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट

By admin | Published: January 01, 2016 12:01 AM

घरपट्टीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट

सिडको विभाग : २८५ थकबाकीदारांना जप्ती वॉरंटसिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी घरपट्टीत डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांची वाढ झाली असून, पाणीपट्टीत मात्र सुमारे ९० लाखांची घट झाली आहे. दरम्यान, मुदत देऊनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर संक्रांतीनंतर मिळकत जप्तीची व जाहीर लिलावाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.महापालिकेच्या सिडको घरपट्टी व पाणीपट्टी विभागाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१४ या दरम्यान घरपट्टीची वसुली ही ९ कोटी ७५ लाख इतकी झाली होती. यंदाच्या वर्षी एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत घरपट्टीची वसुली ही ११ कोटी २५ लाख इतकी झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टीत सुमारे दीड कोटींची वाढ झाली आहे. तर याउलट पाणीपट्टीची परिस्थिती झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१४ या कालावधीत पाणीपट्टीची वसुली ही ४ कोटी ९९ लाख इतकी झाली होती. परंतु यंदाच्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणीपट्टीची वसुली ही ४ कोटी ७ लाख इतकीच झाल्याने पाणीपट्टीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९२ लाखांची घट झाल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.दरम्यान, महापालिकेच्या वतीने ज्या घरपट्टीच्या थकबाकींदाराकडे पाच हजार रुपयांच्या वर थकबाकी आहे, अशा २८५ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजाविण्यात आले आहे. तर इतर सुमारे पाच हजार ३०० थकबाकीदारांना सूचना पत्र देण्यात आले आहे. (वार्ताहर)