जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा रविवारी (दि.३०) पुन्हा एकदा तडाखा बसला. सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथे पोल्ट्रीफार्मचे शेड उडून नुकसान झाले. दरम्यान, त्याखाली दबलेल्या कुटुंबास वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. निफाड तालुक्यातील विंचूर उपबाजार समितीच्या व्यापाऱ्यांचे नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेले कांद्याचे दहा शेड जमीनदोस्त झाले. यावेळी कांदा भिजल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. करंजगाव येथील शेतकरी शंकर राजोळे यांचा पपईचा बाग या वादळी पावसात भुईसपाट झाला आहे. दिंडोरी तालुक्यात शेडनेट उडून पिकांचे नुकसान झाले. लोखंडेवाडी येथे प्रभाकर उगले यांचे शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडत झाड पेटले. सुदैवाने जवळपास कुणी नसल्याने इतर हानी झाली नाही. दरेगाव येथील संत रोहिदास महाराज मंदिराच्या काम सुरू असलेल्या संरक्षण भिंती कोसळल्या. दरम्यान, नाशिक शहरालाही सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले.
नाशिक जिल्ह्यात घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:11 AM