-------------------------------------------------
शासनाच्या नियमाप्रमाणो सदर अतिक्रमण काढण्यात येईल व संबंधित जागा ही श्री. रेणुका देवी मंदिर व खाजगी मालकीचा गट असल्याने येथील ट्रस्टची परवानगी घेतली असून ही योजना चालू करण्यापासून ते आजपर्यंत जे जे अडथळे निर्माण झाले ते काढण्याचे काम आम्ही करून ती योजना वेळेत पूर्ण करण्याचे काम करू. सरकारी कामात कोणीही अडथळा आणू नये. अन्यथा नियमानुसार कारवाई करावी लागेल.
- अभिजित कदम, मुख्याधिकारी, चांदवड नगर परिषद
------------------------------
चांदवडला तीन दिवसांत सात नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. २८ व २९ जून रोजी घेतलेल्या १२६ पैकी ४ अहवाल तर ३० जून रोजी घेतलेल्या २० पैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह असे एकूण सात अहवाल आहेत. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये चांदवड, परसूल, हिवरखेडे, देणेवाडी, काळखोडे, कानमंडाळे आदी एकूण सात जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.