नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरुवारी झालेल्या विभागीय आढावा बैठकीसाठी सत्तार येथे आले होते. सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. पाच वर्षांच्या सत्ताकाळात त्या काम करू शकल्या नाही, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सत्ता गेल्यानंतर एकच महिन्यात त्यांना मराठवाडा भकास का दिसू लागला. यापूर्वी मराठवाडा सुजलाम्-सुफलाम् होता का? मुंडे यांचे आंदोलन ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप सत्तार यांनी केला.औरंगाबाद म्हणायची मला सवलतशिवसैनिक औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करतात, तुम्ही आता शिवसेनेत आहात, मंत्री आहात. तुम्ही नेहमी औरंगाबाद असाच उल्लेख करता असे विचारल्यावर ते म्हणाले, मला काहीच अडचण नाही. संभाजी महाराज हे मोठे राजेच होते, पण शासकीय गॅझेटमध्ये अजूनही औरंगाबाद असाच उल्लेख असल्याने मला सूट असल्याचे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.
मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला? - अब्दुल सत्तार; पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:10 AM