नाशिक : राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी एका बाजूने होत असताना राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेतली तर विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सुचना जारी करून अंतीम परीक्षा घेण्याच्या सुचना विद्यापीठाना केल्या. त्यामुळे परीक्षा घेण्याच्या बाजूने एक गट आणि परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने दुसरा गट उभा राहिला असून विद्यार्थी संघटनांमध्येच अंतीम परीक्षांवरून रंगलेल्या राजकारणात विद्यार्थ्यांचे हित साधण्यासाची विद्यार्थी संघटनांनाही अंतीम परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचा अवडंब करून शैक्षणिक संकुलांमध्ये राजकीय पक्षांची विचार धारा घुसविणाºया वेगवेगळ््या विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थी हित जपण्यासाठी केलेले काम तसे क्वचितच असले तरी वेगलवेगळ्या वादांमध्ये दोन संघटना आमने सामने येण्याचे प्रकारच अधिक ऐकिवात येतात. ही परिस्थिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारखीच दिसून येते. नाशिकमध्ये एका नामांकित महाविद्यालयासमोर अशाप्रकारे दोन विद्यार्थी संघटना आमने सामने येण्याचा प्रकार मागील शैक्षणिक वर्षात घडला असून एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयासमोर दुसºया राजकीय पक्षाच्या विद्यार्थी शाखेने धुडगुस घालण्याचा प्रयत्न केल्याने थेट पोलिसांना आणि दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करावे लागले होते. अशा संघटना आता अंतीम परीक्षेच्या मुद्यांवरून कायदेशीर मार्गाने आणि राजकीय मार्गानेही आमने सामने आल्या असून परस्पर विरोधात विद्यार्थी हिताचा मात्र विचार दुय्यम ठरताना दिसून येत आहे. खरे तर विद्यार्थी संघटनांना त्या खरोखर विद्यार्थ्यांसाठीच काम करीत असल्याचे दाखवून देण्याची कसोटी अर्थात परीक्षाच आहे. परंतू ही परीक्षा देण्यापूर्वी अंतीम परीक्षेविषयी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे काय मत आहे, हे जाणून घेण्याची कोणतीही संघटना प्रयत्न करताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे परीक्षांचे नियोजन झाले तर ते ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांसाठी सोयिस्कर कसे ठरू शकेल याविषयी अभ्यास करण्याची तयारीही कोणत्याही विद्यार्थी संघटनेची दिसून येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मानसिक तेचा अभ्यास न करताच अंतीम परीक्षांच्या मुद्यावरून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या विद्यार्थी संघटना कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून घेतल्या जात असलेल्या अंतीम परीक्षेत कशा पास होणार असा प्रश्न निर्माण झाला असून तो सध्या तरी अनुत्तरीतच असल्याचे दिसून येत आहे.
अंतीम परीक्षेत विद्यार्थी संघटना पास कशा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 9:59 PM
परीक्षा घेण्याच्या बाजूने एक गट आणि परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने दुसरा गट उभा राहिला असून विद्यार्थी संघटनांमध्येच अंतीम परीक्षांवरून रंगलेल्या राजकारणात विद्यार्थ्यांचे हित साधण्यासाची विद्यार्थी संघटनांनाही अंतीम परीक्षा द्यावी लागणार आहे.
ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांची लागणार कसोटी विद्यार्थी हित साधण्याची द्यावी लागणार परीक्षा