शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

जलयुक्तची कामे होणार कशी?

By admin | Published: September 09, 2016 2:13 AM

मुख्यमंत्र्यांचा सवाल : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

नाशिक : जलयुक्त शिवार योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ती यशस्वी व्हावी यासाठी मी स्वत: गावोगावी फिरत आहे, त्यावरून याची गांभीर्यता अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावी, ही कामे म्हणजे काही मोठी रचनात्मक कामे वा इमारतींची बांधकामे नाहीत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांचीच ही परिस्थिती असेल तर दुसऱ्या टप्प्यातील कामे कशी पूर्ण होणार, असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करा, त्यासाठी सामाजिक संस्थांकडून प्रसंगी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार, विहीर पुनर्भरण, सेवा हमी कायदा, पंतप्रधान आवास योजना आदि महत्त्वपूर्ण योजनांच्या आढाव्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात नाशिक विभागाची बैठक बोलविण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी जिल्हानिहाय माहिती जाणून घेतली. नाशिक विभागात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास वीस टक्के कामे अद्यापही अपूर्ण असून, काही कामे तर सुरूदेखील झाली नसल्याची बाब यावेळी त्यांच्या निदर्शनास आली. प्रामुख्याने धुळे जिल्ह्णातील पाच कामांना जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याची बाब लक्षात येताच, फडणवीस यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच त्याबाबत विचारणा केली. कामांचे अंदाजपत्रक उशिराने तयार झाल्याचे सांगण्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी अंदाजपत्रक कोण तयार करतो, अशा प्रश्चांची सरबत्ती केल्यानंतर अधिकारी वर्गाची पाचावर धारण बसली. लालफितीचे कामे करू नका असा सल्ला देतानाच, मी स्वत: या योजनेच्या यशस्वीतेसाठी गावोगावी फिरतो आहे, त्यामुळे त्यामागचे सरकारचे गांभीर्य तुम्ही लक्षात घेऊ शकता. कोणत्याही सबबी न सांगता कामे पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले. नगर जिल्ह्णातील २४ कामे ५० ते ८० टक्के इतकी झाली आहेत. या कामांमध्ये प्रामुख्याने संगमनेर येथील कामांच्या निविदा काढण्यास उशीर झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जलयुक्तची कामे ही मोठी रचनात्मक कामे वा इमारतींची बांधकामे नाहीत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी सबबी न सांगता, कामांची मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ पुढची प्रक्रिया न राबविण्याची बाब खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. साक्री तालुक्यातील १४ कामेदेखील ५० ते ८० टक्के इतकीच झाली आहेत. मात्र पाऊस थांबल्यानंतर कामे होतील, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील कामांना इतका उशीर का अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. नंदुरबार जिल्ह्णातील नवापूर येथील तीन गावांची कामे सुरू होऊ शकली नसल्याची बाब लक्षात आल्यावर कामांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वेगवेगळ्या बाबी शासनाने निश्चित केल्या आहेत. दोन वर्षांनंतरही अधिकाऱ्यांनी कामे न करता कारणे सांगावी हे शोभादायक नाही, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. शेततळ्यांचे पैसे तत्काळ अदा करा‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा आढावा घेताना, काही तालुक्यांमधून अर्जच आले नसल्याचे तर ज्याठिकाणी अर्ज आले, परंतु कामे सुरू झाले नसल्याची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. नाशिक विभागात ८३२० इतके उद्दिष्ट असताना ३१०२० इतके अर्ज आले. त्यापैकी ९६५४ अर्जांना मंजुरी देण्यात आली व ७८०५ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, १८४८ कामे सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली. सिन्नर तालुक्यात ५२० कामे मंजूर झालेली असताना २४४ कामे पूर्ण झाली व उर्वरित ३१७ कामे अद्याप सुरू झाली नाहीत, हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले काय, अशी विचारणा केली असता, त्यावर ट्रेझरीतून पैसे मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणार नसतील तर ती कामे होणार नाहीत, तसेच त्यांचा प्रतिसादही मिळणार नसल्याने शेततळ्याचे अनुदान तत्काळ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सिंचन विहिरींसाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मिळत नसल्याची बाब या आढाव्यातून समोर आली. भुसावळ, एरंडोल, देवळा, त्र्यंबक, साक्री, नवापूर, पाथर्डी, राहूरी, शिरपूर, अमळनेर आदि तालुक्यातील कामे रखडल्याचे यावेळी सांगण्यात आले. विहिरींसाठी पैसे मिळत नसल्याच्याही अडचणींचा पाढा याठिकाणी वाचण्यात आला. ईम्युटेशन अर्थात संगणकीय सातबारा योजनेच्या आढाव्यात तांत्रिक व आर्थिक बाबींचे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या बैठकीस जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री विजयकुमार रावल, पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल अहेर यांच्यासह नाशिक विभागातीय सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.