जळगाव नेऊर (भाऊराव वाळके) : श्वासोच्छ्वास घेण्यास
अडचण, एचआरसीटीचा स्कोअर २० ऑक्सिजनची पातळी ९४ तरीही ८० वर्षीय आजोबाने प्रबळ इच्छाशक्तीच्या
जोरावर कोरोनावर मात करून
मृत्यूला परतावून लावले. विशेष
म्हणजे नियमित आहार, नियमित व्यायाम करून त्यांनी कोरोनावर प्रबळ
इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून
समाजाला सकारात्मक संदेश दिला
आहे.
येवला तालुक्यातील जळगाव नेऊर
येथील ८० वर्षीय लक्ष्मण चांगदेव शिंदे यांना कोरोनाची
लक्षणे दिसू लागल्याने त्यांना खाजगी
डॉक्टरांनी विविध कोविड तपासण्या
करण्यास सांगितल्या असता त्यावरून कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासणी
अहवालावरून रुग्णाचा स्कोअर २० आणि वय ८० अशी परिस्थिती पाहून तातडीने खाजगी
रुग्णालयात दाखल करण्याचा
सल्ला देण्यात आला.
रुग्णाला ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची गरज
लागणार होती; परंतु खाजगी रुग्णालयात स्कोअर व वय पाहता शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्याने येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेजा कृप्पास्वामी डॉ. पंकज पाटील व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे रुग्णाला दोन दिवसांतच बरे वाटू लागल्याने व जेवणही सुरू झाल्याने रुग्ण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले व पंधरा दिवसांच्या घेतलेल्या मेहनतीमुळे कोरोनावर मात करून येवला येथील ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
-----------------
माझे वय ८० व स्कोअर २० असल्याने खाजगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला; पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर, मनाशी घट्ट आशा बाळगून कोणताही विचार न करता येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट होण्याचा निर्णय घेतला, नियमित व्यायाम व योग्य आहार व येथील डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे कोरोनावर मात केली. ज्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यांनी न घाबरता व आजार न लपवता ताण, तणाव न घेता उपचार घ्यावे, कारण मनाने मजबूत असेल तर कोरोना निश्चितच हारेल.
-लक्ष्मण शिंदे, जळगाव नेऊर.
----------------
-जळगाव नेऊर येथे आपल्या कुटुंबासमवेत बसलेले लक्ष्मण शिंदे. (१८ जळगाव नेऊर)
===Photopath===
180521\18nsk_12_18052021_13.jpg
===Caption===
१८ जळगाव नेऊर