शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

आॅक्सिजन सिलिंडरची हुल्क बॉटल फुटली परिचारिका जखमी

By admin | Published: October 17, 2016 12:47 AM

जिल्हा रुग्णालय : अतिदक्षता विभागातील घटना

नाशिक : आॅक्सिजन सिलिंडरला जोडलेल्या पाइपला जोडलेली हुल्क बोटल दबाव वाढल्याने फुटल्याची घटना रविवारी (दि़१६) सकाळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडली़ या घटनेमध्ये अतिदक्षता विभागातील परिचारिका विद्या आंबेकर यांच्या हाताला मार लागला असून, त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत़ तर या विभागातील रुग्ण तसेच नातेवाइकांमध्ये घबराट पसरली होती़ दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज असून, त्यासाठी आॅक्सिजन सिलिंडरचा वापर केला जातो़ जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सकाळी सात वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडरच्या पाईपमध्ये अचानक दबाव वाढल्याने हुल्क बॉटल फुटली़ यावेळी जवळच असलेल्या परिचारिका आंबेकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली़ या घटनेची माहिती परिचारिकांनी वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी आॅक्सिजन सिलिंडर तसेच वातानुकूलन यंत्रणा बंद करण्यास सांगितले़ (प्रतिनिधी)