शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

हम से जो टकरायेगा..., देवळालीच्या फायर रेंजमध्ये तोफांचा सर्वत्र ‘प्रहार’

By अझहर शेख | Updated: January 14, 2020 17:10 IST

सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत....

ठळक मुद्दे‘हम जो टकरायेगा, मिट्टी में मिल जायेंगा’ असा संदेशच जणू शत्रूंना दिलाबोफोर्स, सोल्टम, होवित्झर, वज्र या अत्याधुनिक तोफांसह मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर प्रहार

नाशिक : ठरविलेले ‘लक्ष्य’ निश्चित वेळेत अचूकरित्या भेदत तोफखान्याच्या ताफ्यातील मोर्टारपासून अत्याधुनिक ‘के-९ वज्र’पर्यंत सर्वच तोफा ‘ऑपरेशन विजय’मध्ये धडाडल्या. नाशिकच्यादेवळाली तोफखाना केंद्राचा गोळीबार मैदान मंगळवारी (दि.१४) युध्दजन्य सराव अभ्यास प्रात्याक्षिकांदरम्यान दणाणून निघाले. भारतीय जवानांनी आपल्या शौर्य अन् कौशल्याच्या जोरावर दाखविलेल्या शक्तीप्रदर्शनातून सैन्य दिनाच्या पुर्वसंध्येला ‘हम जो टकरायेगा, मिट्टी में मिल जायेंगा’ असा संदेशच जणू अप्रत्यक्षपणे शत्रूंना दिला.

नाशिकच्या देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरी केंद्रातून भारतीय जवानांना तोफा चालविण्याचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट कुशल असे ‘गनर’ बनविले जाते. सैन्याचा पाठीचा कणा व युध्दात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या सशक्त अशा भारतीय तोफखान्याकडून होणारा विकसीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बघून शत्रू देशावर वक्रदृष्टी करण्याअगोदर कितीतरीवेळा विचार करेल, हेच या प्रात्याक्षिकांमधून अधोरेखित झाले.
अवघ्या काही सेकंदात एकापेक्षा अधिक बॉम्ब लक्ष्यावर अचूक डागण्याची क्षमता असलेल्या १३०एमएम, १०५ एम.एम., उखळी मारा करणारी हलकी तोफ, कारगिल युद्धात शत्रूला सळो की पळो करून सोडणारी १५५ एम.एम. बोफोर्स, १३० एम.एम. सोल्टम, होवित्झर एम-७७७ आणि के-९ वज्र या अत्याधुनिक तोफांसह मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने प्रशिक्षित जवानांनी दिलेले लक्ष्य निर्धारित मिनिटांत अचूकपणे भेदले. शौर्य, कौशल्य, देशप्रेमाच्या जोरावर तोफखान्याच्या सैनिकांनी युध्द सराव प्रात्याक्षिकाद्वारे ‘हम भी किसी से कम नहीं’ असा संदेश शत्रूला दिला.होवित्झर, बोफोर्स तोफांनी दागलेले बॉम्बगोळे आणि वज्रकडून तितक्याच ताकदीने झालेला बॉम्बहल्ला शत्रू राष्टÑांच्या मनात धडकी भरविणारा होता. कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारण्यास यशस्वी ठरलेल्या सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत संभाव्य काळात कोणत्याही युद्धाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफांसह आम्ही सज्ज असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अति विशिष्ट सेवा मेडल विजेते लेफ्टनंट जनरल दिपींदर सिंह अहुजा यांच्यासह तोफखाना केंद्राचे कमान्डंट लेफ्टनंट जनरल रणबिरसिंग सलारिया यांच्यासह भारतीय वायुसेना, नौसेना, भुदलाचे अधिकारी जवानांसह प्रशासकीय सेवेतील अधिकारी उपस्थित होते. तसेच अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, केनिया, बांग्लादेश, नेपाळ, भुतान, युगांडा, अफगाणिस्तान, ओमान, सौदी अरेबिया आदि देशांमधील भुदल, नौदल, वायूदलाचे जवानांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
लढाऊ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरतीया सोहळ्यादरम्यान युद्धभूमीवर जशी तोफांची भूमिका महत्त्वाची ठरते तसे लढाऊ हेलिकॉप्टरची भूमिकाही तितकीच आवश्यक असते, याचे प्रात्यक्षिकदेखील आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या वैमानिकांनी सादर केले. चेतक, ध्रुव, रुद्र या लढाऊ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवानांनी चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. १० हजार फूट उंचीवरून पॅराशूटद्वारे युध्दभूमीवर सैनिकांची दाखल होण्याचे कसबही यावेळी सादर केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndian Army Dayभारतीय सैन्य दिनNashikनाशिकdevlali-acदेवळालीSoldierसैनिक