मालेगाव : मोसमनदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली होती. या मानवी साखळीत सुमारे चार हजार विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.शहरातील मोसमनदी सध्या गटार गंगा बनली आहे. नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. नदीची स्वच्छता करण्यासाठी व वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळा- महाविद्यालयांनी मोसम नदीभोवती मानवी साखळी केली होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल परिसरात चार हजार विद्यार्थी छत्री उघडून उभे असल्याने लक्षवेधी ठरले होते. मोसमनदीच्या बचावासाठी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत.यावेळी मनपा आयुक्त संगीता धायगुडे, संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित, राजेंद्र अमीन, चेअरमन नितीन पोफळे, सहसेक्रेटरी सतीश कलंत्री, रामनिवास सोनी, प्रल्हाद शर्मा, सुभाष ठाकरे, भोगीलाल पटेल, गोविंद तापडिया, विजय कुलकर्णी, मुख्याध्यापक, प्राचार्य आदी उपस्थित होते.
मोसमनदी प्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांची मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 7:08 PM