पंचवटी : कोरोनामुळे जवळची माणसेही कशी दुरावतात आणि मरणानंतरही यातना कशी पाठ सोडत नाहीत, याचा प्रत्यत पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात नुकताच आला. एका वृद्धेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कोणीही धजावत नसल्याने तब्बल ९ तास मृतदेह घरात पडून असल्याची बाब समोर आली आहे. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या वृद्धेच्या मृत्यूमुळे एक मुलगा, नातवंडे अक्षरशः उघड्यावर आली असल्याचे चित्र दिसून आले.मखमलाबाद नाका येथील एका इमारतीत रहिवासी सिंधू बारक पिंगळे (७१) या वृद्धे चे शनिवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. यावेळी त्यांची दोन लहान नातवंडे आणि मुलगा घरात होते. त्यांनी काही ठिकाणी फोन करून मदतीची याचना केली, मात्र कोणीही मदतीला आले नाही. मदती अभावी हतबल झालेले कुटूंबिय तसेच बसून राहीले. कोणीतरी आपल्याला मदत करेल यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र मदत न मिळाल्यामूळे वृद्धेचा मृतदेह तब्बल ९ तास घरात पडून होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष अँड सुरेश आव्हाड यांना ही बाब कळताच आव्हाड यांच्या सह भास्करानंद गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते जय जोशी, प्रकाश हांडोरे यांनी पुढाकार घेवून अंतिमसंस्कार पार पाडले अमरधाम मधील सुनीता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. या वृध्देच्या पतीचे या आधीच करोनाने निधन झाल्याने नागरीकांनी कुटूंबियांच्या मदतीसाठीच्या याचनेकडे कानाडोळा केल्याचे समजते.
इथं माणुसकीही ओशाळली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 1:38 AM
कोरोनामुळे जवळची माणसेही कशी दुरावतात आणि मरणानंतरही यातना कशी पाठ सोडत नाहीत, याचा प्रत्यत पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात नुकताच आला.
ठळक मुद्देमृतदेह नऊ तास घरात; कार्यकर्त्यांचा मदतीने अंत्यसंस्कार