इंदिरानगर : वडाळागावातून जाणारा सावित्रीबाई झोपडपट्टीलगतचा १00 फुटी रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सिंहस्थ कुंभमेळा अगोदर मुंबई-आग्रा महामार्ग समांतर रस्ता ते वडाळागावापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरून राजीवनगर झोपडपट्टी, राजे छत्रपती चौक, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक १ आदि मार्गे पुणे महामार्गास जवळचा मार्ग असल्याने वाहनधारकांना सोयिस्कर झाले होते. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. गेल्या शनिवारी व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने सावित्रीबाई झोपडपट्टी लगतच्या १00 फुटी रस्त्यास लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने वाहने घसरून लहान-मोठे अपघात होत आहे. तसेच वाहनांचे नुकसानही होत आहे. सुमारे दहा महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले डांबरीकरण उखडत असून, काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
शंभरफुटी रस्ता खड्डेमय
By admin | Published: July 21, 2016 10:37 PM