नाशिक : शेतकºयाकडून १,४२५ रुपये किलोप्रमाणे मका खरेदी करून तो रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना अवघ्या एक रुपये दराने विक्री करण्याच्या आतबट्ट्याच्या व्यवहारात मोठी आर्थिक झळ बसलेल्या राज्य सरकारने पणन महामंडळामार्फत आधारभूत किमतीत खरेदी केल्या जाणाºया मक्याची खरेदी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात नोंदणी केलेल्या सुमारे दीड हजार शेतकºयांकडे ५० हजार क्व्ािंटलपेक्षाही अधिक मका पडून राहिला आहे. शासनाच्या भरवशावर असलेल्या शेतकºयांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली आहे. व्यापाºयांनी भाव पाडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पणन महामंडळामार्फत खरेदी केंद्रे सुरू करण्यास अनुमती दिली तसेच मका उत्पादक शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केली होती. नोव्हेंबर महिन्यात नोंदणीला सुरुवात करण्यात आली व ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणाºया शेतकºयांचाच मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात ३,४५८ शेतकºयांनी नोंदणी केली होती. शेतकºयांची वाढती मागणी पाहून पणन महामंडळाने जिल्ह्यात दहा ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्याची कार्यवाही केली, मात्र गुदामांच्या उपलब्धतेमुळे काही ठिकाणी खरेदी केंदे्रे सुरू होण्यात उशीर झाला. याच दरम्यान गेल्या वर्षी आधारभूत किमतीत खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्यामुळे गुदामांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्यामुळे जिल्ह्यात १,९२६ शेतकºयांकडून गेल्या तीन महिन्यांत ९६,६३४ क्व्ािंटल मका खरेदी करण्यात आला. त्यातील बºयाचशा शेतकºयांना अजूनही शासनाकडून पैसे मिळालेले नाहीत.
राज्य शासनाकडून मका खरेदी अचानक बंद शेतकरी हवालदिल : ५० हजार क्व्ािंटल टन पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:44 AM
नाशिक : आर्थिक झळ बसलेल्या राज्य सरकारने पणन महामंडळामार्फत आधारभूत किमतीत खरेदी केल्या जाणाºया मक्याची खरेदी बंद केली आहे.
ठळक मुद्देशेतकºयांना मोठा धक्का बसलाआधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय