शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

शेकडो घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:01 AM

नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदे येथे मंगळवारी (दि. ५) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, सिन्नर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे मान्सूनपूर्वचा फटका सिन्नरला पावसाचा तडाखा

नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.गोंदे येथे मंगळवारी (दि. ५) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, सिन्नर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाना दिल्या आहेत.सिन्नर तालुक्यातील काही भागात रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. शनिवारी रात्री दापूर, चापडगाव, धुळवड, सोनेवाडी या भागाला मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर वातावरणात असह्य उकाडा असल्याने दुपारपासून पावसाचे वेध लागले होते. यावेळी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, सरपंच उषा दत्तात्रय सोनवणे, विस्तार अधिकारी पी.एम. बिब्वे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बिन्नर, कृषी सहायक दादासाहेब जोशी, ग्रामसेवक मच्छिंद्र भणगीर, तलाठी जे.यू. परदेशी, सुभाष रणशेवरे, भागवत तांबे, दत्तात्रय सोनवणे, बाळासाहेब तांबे उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना कोलमडल्यामान्सूनपूर्व पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोनेवाडी, चापडगाव व गोंदे परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचे खांब वाकल्याने व वीजवाहिन्या खंडित झाल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळाचा फटका वीज यंत्रणेवर झाल्याने ठिकठिकाणी त्याचा परिणाम झाला असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत.भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. त्यामुळे २१ गावांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच परिसराचे भवितव्य अवलंबून असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच नांदूरशिंगोटे व दापूर वीज उपकेंद्राचा गेल्या २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागणार आहे.दापूर व गोंदे परिसरात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार वारासुटला. त्यानंतर वादळाने उग्र्रअवतार धारण केल्याने शेतकºयांची एकच धावपळ उडाली. ७ वाजेच्या सुमारास वादळासह पावसाने सुरु वात केली होती. सुमारे दोन तास झालेल्या जोरदार वाºयासह पावसाने हाहाकार उडाला होता.४वाड्या-वस्त्यांवर राहणाºया लहान कुटुंबातील घरांचे छत उडाल्याने संसार रस्त्यावर आले आहेत. पडवीत असणाºया शोभा राधाकिसन तांबे (४५) यांच्या अंगावर पत्रे पडल्याने जखमी झाल्या आहेत. शंभरच्या आसपास घरांचे नुकसान झाले असल्याचे समजते. वादळामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, काही ठिकाणी विजेचे खांब वाकले तर वीजवाहिन्या रस्त्यावर पडल्या आहेत. जनावरांचे गोठे, डाळिंबबागा कोलमडून पडल्या आहेत. दत्तात्रय सोनवणे यांचे ट्रॅक्टर, एम.डी. तांबे यांची वॅगनर गाडीवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. भागवत तांबे यांच्या डाळिंबबागासह शेतात उभ्या असलेल्या वालवड, टोमॅटो, कांदा आदीसह पिकांचे नुकसान झाले असून, शेतात उघड्यावर असलेला जनावरांचा चारा भिजल्याने शेतकºयांपुढे संकट उभे राहिले आहे. नांदूरशिंगोटे, दोडी, माळवाडी, दापूर, चापडगाव, भोजापूर आदी भागात सोमवारी रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली होती. रोहित्र खराब झाल्याने रात्रभर वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता.