शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चांदवडला शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:58 AM

चांदवड : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजने अंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याचा आरोप करीत नारायणगाव येथील संदीप व राजेंद्र बाळासाहेब मांदळे या शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देतालुका कृषी अधिकºयांना निवेदन सादर

चांदवड : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजने अंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याचा आरोप करीत नारायणगाव येथील संदीप व राजेंद्र बाळासाहेब मांदळे या शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.मांदळे यांनी शेतीपिकाचे सुमारे १३ लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत अपूर्णावस्थेतील कामाचा, पुरवलेल्या साहित्याचा व नुकसान झालेल्या शिमला मिरची पिकाचा वस्तुनिष्ठ पंचनामा व अहवाल मिळावा अशी मागणी केली आहे. तालुक्यातील महाराष्ट्र कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजनेंतर्गत शेडनेट उभारण्यासाठीची ५० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत तालुक्यातील नारायणगाव येथील शेतकरी संदीप मांदळे यांचे भाऊ राजेंद्र मांदळे व किरण मांदळे यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये याप्रमाणे एकूण २० लाख रुपये खर्च करून शेडनेट हाउस प्रकल्पाची उभारणी केली होती.मात्र शेडनेटची उभारणी करताना पुरवठादाराने शासननिर्णयानुसार साहित्य न पुरवता शेडनेट व शेडनेटचे सर्व साहित्य निकृष्ट प्रतीचे पुरवले तसेच सूक्ष्म सिंचनाचे काम अपूर्ण ठेवल्याने डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत दोन्ही शेतकºयांच्या शिमला मिरचीपिकाचे प्रत्येकी साडेसहा लाख असे एकूण सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मांदळे यांनी सांगितले.याबाबत मांदळे यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती चांदवड, तहसील, प्रांत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय आदी संबंधित विभागांशीपत्रव्यवहार केला होता. मात्र कोणतीही माहिती देण्यात न आल्याने संपूर्ण माहिती मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा मांदळे यांनी दिला आहे. आयुक्तालय व कृषी अधीक्षक यांनी, सदर पुरवलेले साहित्य, अपूर्णावस्थेतील काम व पिकाचे नुकसान याबाबत तपासणीचे आदेश काढूनही त्याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मांदळे यांनी केला आहे. मुद्देनिहाय माहिती देण्याबाबत दि. २३ एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकºयांना निवेदन सादर करून उपोषणाचा इशारा दिला होता.