मालेगाव : कर्जमाफीबाबत शिवसेनेने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मार्केट यार्ड येथील विभागीय कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. स्टेट बॅँक, बॅँक आॅफ महाराष्ट्र व जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे कर्जमुक्ती-बाबतच्या लाभार्थींची यादीची प्रत मिळावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे शहरप्रमुख रामा मिस्तरी, बंडूकाका बच्छाव, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, सुनील देवरे, विनोद वाघ, नीलेश आहेर, आशा अहिरे, सखाराम घोडके, नारायण शिंदे, राजेश गंगावणे, ज्योती भोसले आदि कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी बॅँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करून त्या त्या शाखांच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने शेतकऱ्यांसाठी दीड लाखांची कर्जमाफी केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांचे अनुदान देण्याचे मान्य केले आहे. आपल्या शाखेतून कर्जमाफ झालेले किंवा अनुदान पात्र शेतकऱ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावून जाहीर करावी.
मालेगावी विविध संघटनांचे उपोषण आंदोलन
By admin | Published: July 10, 2017 11:50 PM