शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

मजुरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 11:25 PM

कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलत संपूर्ण देश लॉकडाउन आहे. अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजुरांनी आपल्या घराकडचा रस्ता धरला. अनेक समस्यांना तोंड देत हे मजूर अक्षरश: पायपीट करत आपल्या गावांत दाखल झाले खरे; पण आता पोटाची खळगी भरायची कशी, असा मोठा प्रश्न कळवण तालुक्यातील आदिवासी मजुरांसमोर उभा राहिला आहे.

ठळक मुद्देलॉकडाउन : पायपीट करत गावांत दाखल झाले; पण पोटाची खळगी भरायची कशी ?

मनोज देवरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलत संपूर्ण देश लॉकडाउन आहे. अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजुरांनी आपल्या घराकडचा रस्ता धरला. अनेक समस्यांना तोंड देत हे मजूर अक्षरश: पायपीट करत आपल्या गावांत दाखल झाले खरे; पण आता पोटाची खळगी भरायची कशी, असा मोठा प्रश्न कळवण तालुक्यातील आदिवासी मजुरांसमोर उभा राहिला आहे.कळवण तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पुनंद परिसरातील काठरे, उंबरगव्हाण, भौती, शिरसा, ठाकरे पाडा, उंबरदे, तिळगव्हाण, महाल, जांभाळ, पायरपाडा, उंबरेमाळ या वाड्यावस्ती व गावांमध्ये दरवर्षी दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मजुरांना मुबलक रोजगार मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील आदिवासी मजूर मोठ्या प्रमाणावर दरवर्षी स्थलांतर होतात. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, पिण्याला पाणी नाही अशा परिस्थितीत करायचे काय? या चिंतेमुळे यावर्षीही मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले होते.कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलत संपूर्ण देश लॉकडाउन केला, अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी परप्रांतात व परजिल्ह्यात व शेजारील तालुक्यात शेतकामासाठी गेलेल्या मजुरांनी आपला मोर्चा घराकडे वळवला आहे. अनेक समस्यांना तोंड देत हे मजूर अक्षरश: पायपीट करत गावांत दाखल झाले खरे; पण आता पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे.घरात धान्याचा कणही शिल्लक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घराच्या बाहेर पडावे तर कोरोनाची भीती आणि घरात उपासमार अशा दुहेरी कात्रीत हे आदिवासी मजूर सापडले असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. शासनाने गोरगरीब जनतेला तीन महिने धान्य वाटप करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्यापपर्यंत याचा लाभ या आदिवासीना मिळालेला नाही. जाहीर केलेले मोफत धान्य तातडीने देण्याबाबत पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ धान्य वाटप करून या गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरणार नसून यासोबत तेल, मिरची, मीठ, हळद यासारख्या जीवनावश्यक गोष्टीही देण्याची खºया अर्थाने गरज असून, प्रशासनाने पुढाकार घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे. पश्चिम पट्ट्यातील अनेक आदिवासींकडे रेशनकार्ड नाही, अनेक आदिवासी बांधव वंचित आहेत, रेशनकार्ड मिळाले आहे; पण त्याची नोंद नाही, आॅनलाइन कार्ड झालेले नसल्याने रेशन मिळत नाही, रेशकार्ड नसल्याने धान्यापासून त्यांना डावलण्यात येऊ नये तर पंचनामा करून त्यांना रेशन देण्यात यावे. हातावर पोट असलेल्या या आदिवासींनी लॉकडाउनच्या काळात जगावं कसं, हा प्रश्न आहे. रोजच्या जगण्याची लढाई लढता लढता माणूस म्हणून जगणंच हरवलेला आदिवासी कोरोनाच्या संकटात मात्र अधिकच हतबल झाला आहे. दुष्काळ अवकाळी अन् कोरोनाचे संकटकधी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक संकटात असताना आता कोरोना नावाचे नवीन संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे या संकटाचा रोजच्या जगण्याच्या लढाईत सामना करायचा कसा, असा प्रश्न या आदिवासींसमोर उभा राहिला आहे. शेतीकामासाठी गेलो होतो. परंतु काम अर्धवट सोडून निघून आल्याने मालकाकडून पुरेसे पैसे मिळाले नाहीत. घरी हाताला काम नाही. काम केल्याशिवाय जगू शकत नाही. भूमिहीन आहे त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.- राजू बर्डे, वाड्याआंबापुनंद परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात, आता गावी आले आहे. रेशन व शासनाची मदत त्यांच्यापर्यंत अजून पोहचलेली नाही. मदत पोहोचली नाही तर येथील आदिवासी बांधव भुकेने मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- गुलाब लांडगे, महाल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य