--------------------
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रल्हाद विब्वे, ग्रामविकास अधिकारी बोरसे, सरपंच स्मिता निकम, उपसरपंच बाबासाहेब पगार आदींनी पांगारकर यांची भेट घेऊन समस्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले; परंतु समाधान न झाल्यामुळे उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. सदर उपोषणाची मुख्यमंत्री कार्यालयाने तत्काळ दखल घेतली असून, त्यांचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी ग्रामविकास, कृषी, दुग्ध व्यवसाय विकास विभागास पाठविण्यात आले असल्याचे पांगारकर यांना ई-मेलद्वारे कळवले आहे.
-------------------------
गावातील आरोग्य व स्वच्छतेची समस्या
रस्ते बनवले; पण त्याखाली अंडरग्राउंड पाइपलाइन नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. डासांचे साम्राज्य वाढले आहे. सार्वजनिक शौचालय, मुतारी यांचे नियोजन नसल्याने बऱ्याच ठिकाणी पडीक क्षेत्राचा वापर होऊन घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी वाढली असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला आहे.
-------------
पांगरी येथे विविध समस्या सोडवण्यासाठी संत हरिबाबा मंदिराच्या प्रांगणात उपोषणाला बसलेले अरुण पांगारकर. (२४ सिन्नर ४)
===Photopath===
250521\25nsk_40_25052021_13.jpg
===Caption===
२४ सिन्नर ४