नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात न्यायालयाने राज्यात वास्तव्यास असलेल्या आसामी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती मागविल्याने नाशिक जिल्ह्यात ९७ आसामी नागरिकांची शोधाशोध करण्यात येत आहे. प्रधान सचिवांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडून याबाबतची माहिती जाणून घेतली.आसामी नागरिकांच्या बाबतीत २०१२ मध्ये सर्वाेच्च न्यायालायात याचिका दाखल झाली. न्यायालयाच्या आदेशान्वये आसामी नागरिकांचा शोध व त्यांची माहिती गोळा केली जात आहे. आसाम राज्यातील राष्टÑीय नागरिक नोंदवही अद्यावतीकरण करण्यात येत असल्याने मूळ आसामचे रहिवासी, परंतु अन्य राज्यात वास्तव्यास गेलेल्यांचा त्यात समावेश आहे. १३ जिल्ह्णांमध्ये सुमारे १,५९० इतके आसामी नागरिक वास्तव्यास असल्याची शासनाकडे माहिती असून, या सर्व जिल्ह्णांच्या जिल्हाधिकाºयांना आसामी नागरिकांची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्णात ३१ आसामींची प्राथमिक माहिती प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. त्यात प्रामुख्याने देवळाली कॅन्टोंमेट बोर्डाच्या हद्दीत, नाशिक महापालिका, सिन्नर, इगतपुरी नगरपालिका हद्दीत, मालेगाव महापालिका व ग्रामीण भागात त्यांंचे वास्तव्य असल्याची खात्री तलाठ्यांकरवी केली जात आहे.