नाशिक : ताजा हुरडा आणि मिसळीच्या या अनोख्या पार्टीचा आस्वाद घेत शंभरहून अधिक सखींनी गोड गुलाबी थंडीत चवदार आस्वादाची अनुभूती घेतली. या चटकदार मेजवानीत लोकमत सखी मंच सदस्यांसह अन्य महिला वर्गानेदेखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आनंद लुटला.
नवीन वर्षात सर्व मैत्रिणींसह धम्माल करण्याची ही संधी सखींना मिळाली. साधना व्हिलेजमध्ये या बहारदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अस्सल गावरान हुरडा आणि साधना चुलीवरच्या मिसळीचे अत्यंत बहारदार व्यवस्थापन साधना इस्टेटमध्ये करण्यात आल्याने सखींनी मनमुराद आनंद मिळवला. तसेच सखींनी गोडीशेव, रेवडी, दही, चटण्या, बोरांची लज्जत चाखतानाच हौजी हंगामा आणि बैलगाडी सफारीचीही लज्जत अनुभवली. त्याशिवाय विविध खेळांमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याचीही संधी सखींनी साधली. तसेच यावेळी दादासाहेब फाळके नाट्यकला संस्थेच्या वतीने पडद्यामागील स्वर्ग ही एकांकिका सादर करण्यात आली. ओमकार टिळे दिग्दर्शित या एकांकिकेचाही सर्व सखींनी आनंद लुटला. या एकांकिकेत कल्याणी कहार, स्नेहा कुयटे, प्रबुद्ध मागाडे, वैभव काळे, प्रसाद चव्हाण, आसावरी चिल्लोरे, मानस शिंदे, अंकिता जाधव, हर्षल खैरनार यांनी योगदान दिले. यंदाच्या पार्टीमध्ये नाशिक शहरासह सिन्नर, येवला, निफाड, घोटी, ओझर येथील सखींनीदेखील सहभाग नोंदवत आनंद घेतला.
लोगो आणि फोटो
पीएचजेएन ८३ - पडद्यामागील स्वर्ग नाटकातील एक प्रसंग.
०७हुरडा पार्टी- हुरडा मिसळ पार्टीत सहभागी सखी.
लोकमत सखी मंच लोगो वापरावा. रविवारी प्रसिद्धी अत्यावश्यक.