जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील रेंडाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक तीन न्याहारखेडे खुर्द मधून स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे संपर्कप्रमुख श्रावण देवरे व याच वार्डातुन त्यांच्या पत्नी मंदाबाई देवरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. याच वार्डातुन अनुसूचित जाती जागेवर प्रभाकर गरुड विजयी झाले.न्याहारखेडे बुद्रुक वार्ड क्रमांक एक मधून सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर हमीदा मुलतानी व बानोबी मुलतानी तर नागरीकांचा मागास प्रवर्ग स्री राखीव जागेवर फिरदोस मुलतानी निवडून आले.रेंडाळे वार्ड क्रमांक दोन मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव जागेवर नंदा चिखले, सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर सुनिता आहेर तर अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागेवर कमल मोरे निवडून आले, विजयी उमेदवारांचा सत्कार करून गुलालाची उधळण करण्यात आली.
रेंडाळे ग्रुप ग्रामपंचायतीत पती-पत्नीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 8:50 PM
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील रेंडाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक तीन न्याहारखेडे खुर्द मधून स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे संपर्कप्रमुख श्रावण देवरे व याच वार्डातुन त्यांच्या पत्नी मंदाबाई देवरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. याच वार्डातुन अनुसूचित जाती जागेवर प्रभाकर गरुड विजयी झाले.
ठळक मुद्देविजयी उमेदवारांचा सत्कार करून गुलालाची उधळण