नाशिक : दुचाकीवरून जात असताना बकरीला धक्का लागल्यानंतर शेळीपालन करणाऱ्याने औषधोपचारासाठी पैशांची मागणी करून दुचाकीवरील दाम्पत्यास जबर मारहाण केली तसेच महिलेचा विनयभंग केला. सदर घटना रविवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित सुनील दिलीप शिंदे (रा. अश्वमेधनगर, विठाईनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक दाम्पत्य पेठरोडने अश्वमेधनगरकडे आपल्या घरी जात होते़ यावेळी रस्त्यावरील सात-आठ शेळ्यांपैकी एक शेळी अचानक दुचाकीसमोर आल्याने धक्का लागला़ या घटनेनंतर संतप्त शेळीपालकाने या दाम्पत्याची दुचाकी अडवून शिवीगाळ करीत बकरीच्या नुकसानभरपाईची मागणी केली़ यानंतर आपल्या सहकाºयांना बोलावून या दाम्पत्यास बेदम मारहाण केली़ तर महिलेचे केस पकडून जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केला़ संशयितांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्यास उपचारासाठी दिंडोरी रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ विशेष म्हणजे आपल्या सहकाºयांसमवेत दाम्पत्यास मारहाण करणारा संशयित शिंदे हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात आला होता़ यावेळी म्हसरूळ पोलिसांनी मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नातेवाइकांना वाद आपसात मिटवून घेण्याचा व टवाळखोरांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला़ परंतु, मारहाण झालेले दाम्पत्य फिर्याद दाखल करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी संशयित शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला़ दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित शिंदेविरोधात मारहाण, शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विवाहितेचा विनयभंग करून पतीला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:26 AM