मालेगाव : काष्टी येथे पहिल्या पत्नीस नांदावयास येऊ दिले नाही, म्हणून दुसऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या केदा पंडित बच्छाव (३२) यास येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गाडगे यांनी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ अनिल नथ्था निकम (३५) रा. वडेल यांनी आॅक्टोबर २०१२ मध्ये वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन वर्षांपासून आपली पहिली पत्नी उज्ज्वला हिस नांदविण्यास आणू दिले नाही, या कारणावरून केदा बच्छाव वेळोवेळी दुसरी पत्नी केदाबाई ऊर्फ ललीता केदा बच्छाव हिला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करत असे. त्यातून १६ आॅक्टोबर २०१२ मध्ये आरोपीने केदाबाईला मारहाण करीत लाकडी दांड्याने तिचे डोके फोडले व तिला जिवे ठार मारल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, तसेच त्याचा मोबाइलदेखील बंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप
By admin | Published: January 31, 2015 12:24 AM