वडाळीभोई : किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात होऊन पत्नीने पतीचा खून केल्याची घटना तालुक्यातील शिरसाणे येथे घडली आहे. चांदवड तालुक्यातील शिरसाणे येथे दत्तात्रय भिकाजी जाधव यांचा चिंचोले शिवारात पोल्ट्री फॉर्म आहे. या फार्मवर गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील म्हाळुंगा येथील चंदर रमेश धुळे (३८) व हिराबाई चंदर धुळे (३३) हे दोघे मजुरीसाठी गेल्या दोन वर्षापासून राहत. सोमवारी (दि. ६) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दत्तात्रय भिकाजी जाधव यांच्या शिरसाणे येथील गट नंबर १२६ मध्ये धुळे दांपत्यामध्ये भांडण झाले. त्यात रागाच्या भरात पत्नी हिराबाई धुळे हिने पती चंदर रमेश धुळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. त्यात चंदर यांचा मृत्यू झाला अशी फिर्याद दत्तात्रय भिकाजी जाधव यांनी वडाळीभोई पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक ए.ओ. पाटील, अरुण पाटील, कर्डेकर, शेख, अहिरे, महिला पोलीस चव्हाण, मोरे, वाघ, कराड, गांगुर्डे आदि गेले त्यांनी खून करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. (वार्ताहर)
कुऱ्हाडीने वार करत पत्नीकडून पतीचा खून
By admin | Published: March 09, 2017 12:50 AM