नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा वार्षिक ३९०वा संदल-ए-खास विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंजारघाट येथील बाबांच्या बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी जुने नाशिकमधून पवित्र चादर शरीफची मिरवणूक काढण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मागील तीन दिवसांपासून उसळली होती.हुसेनी बाबा यांचा वार्षिक संदल दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही गुरुवारपासून धार्मिक कार्यक्रमांना बडीदर्गामध्ये प्रारंभ करण्यात आला. संदल-ए-खासच्या निमित्ताने सायंकाळी मौलाना सोहेल रजवी यांचे प्रवचन झाले. त्यांनी सुफी संतांची शिकवण आणि जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शनिवारी इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित काव्यमैफल (नात-ए-पाक) संपन्न झाली. या मैफलीत नातख्वां शादाब रजा यांनी एकापेक्षा एक सरस नातचे आपल्या सुमधुर आवाजात सादरीकरण केले.
हुसेनी बाबा यांचा संदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:16 AM
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा वार्षिक ३९०वा संदल-ए-खास विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देबडी दर्गावर रोषणाई : भाविकांची लोटली गर्दी