शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

मानवी कवट्यांद्वारे बाबा चाले अघोरी कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 11:12 PM

नाशिक : तंत्र-मंत्राद्वारे पूजाविधीचा देखावा मांडून भोंदूगिरी करणारा कथित गणेशानंदगिरी महाराज ऊर्फ ह्यबडे बाबाह्ण हा नाशिक शहराजवळच्या खेड्यांमध्ये आघोरी प्रकार करण्यासाठी स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या चक्क मानवी कवट्यांचाही वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. या भोंदू ह्यबडे बाबाह्णने यासाठी काही ह्यएजंटह्णदेखील नेमले होते आणि त्यांच्यामार्फत अमरधाममधून मानवी कवट्या तो मिळवत होता.

ठळक मुद्देस्मशानभूमीतून पुरवठा : तंत्र-मंत्रांच्या आधारे पूजाविधीचा देखावा; भोळ्याभाबड्यांची लाखोंची फसवणूक

नाशिक : तंत्र-मंत्राद्वारे पूजाविधीचा देखावा मांडून भोंदूगिरी करणारा कथित गणेशानंदगिरी महाराज ऊर्फ बडे बाबा हा नाशिक शहराजवळच्या खेड्यांमध्ये आघोरी प्रकार करण्यासाठी स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या चक्क मानवी कवट्यांचाही वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. या भोंदू बडे बाबाने यासाठी काही ह्यएजंटह्णदेखील नेमले होते आणि त्यांच्यामार्फत अमरधाममधून मानवी कवट्या तो मिळवत होता.नाशिकच्या पाथर्डीमध्ये बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट स्थापन करत संशयित आरोपी गणेश जयराम जगताप (३७, रा. श्रद्धा व्हिला, पाथर्डी फाटा) याने ह्यमहामंडलेश्वर१००८ह्ण अशी पदवी स्वत: लावून घेत स्वत:ला श्री. श्री. १००८ महंत गणेशानंदगिरी महाराज (कथित) बनवून घेतले. येथील अमरधाममधून काही लोकांना हाताशी धरून या भोंदू बाबाचे खास एजंट रात्रीच्या अंधारात येऊन संबंधितांच्या हातांवर नोटा टेकवून बेवारस प्रेतांचे अर्धवट जळालेल्या कवट्या घेऊन पोबारा करत होते. या कवट्या महिन्यातून जसे ग्राहक भेटतील त्याप्रमाणे पूजाविधीच्या बनावासाठी वापरल्या जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.दैवी चमत्काराद्वारे जमिनीतून मिळालेले सोने स्वत:ला वापरता येत नाही, असे सांगून बनावट सोन्याच्या विटा अन‌् पितळी धातूंच्या पट्ट्या भक्तांच्या हातावर देत त्यांच्याकडून हजारो-लाखोंची रोकड उकळल्याप्रकरणी इंदिरानगर, सातपूर या दोन उपनगरांमधील पोलीस ठाण्यांत संशयित गणेशानंदगिरी महाराजविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.कथित महाराजाची ट्रस्टच्या प्रयत्नातून निफाड तालुक्यातील धारणगाव-खडक येथे सप्तशक्ती देवीचे २१ कळस असलेले मंदिर उभारणी तसेच गोशाळा, माध्यमिक शाळा, भक्तनिवास यांसारखे सामाजिक कल्याणकारी उपक्रम होऊ घातल्याचा बनाव जाहिरातींच्या माध्यमातून केला गेला. याद्वारे भोळ्याभाबड्या लोकांकडून लाखो रुपये उकळले. नाशिकसह राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये या भोंदूबाबाने अनेक मोठे मासे आपल्या गळाला लावले आहेत. हा भोंदूबाबा भोळ्याभाबड्या जनतेची आर्थिक लूट करून ह्यमायाह्ण जमवत होता. पाथर्डी येथे त्याने ट्रस्टचे मुख्य कार्यालय म्हणून स्वत:च्या निवासस्थानालाच त्याने आश्रमचे स्वरूप दिले आहे.लोटांगण घालणारे ते कलाकार मोकाटचबाबा जेथे जात तेथे अगोदरपासून उपस्थित राहून या भोंदू गणेशानंदगिरी महाराजांच्या पायांवर लोटांगण घालत वातावरणनिर्मिती करणाऱ्या पडद्यामागील बहुतांशी कलाकार अद्यापही मोकाटच फिरत आहे. यामध्ये बाबाला मानवी कवट्या पुरविणाऱ्यांपासून तर स्वत:च्या मळ्यात आघोरी कृत्यासाठी जागा देण्यापर्यंत आणि ताळेबंद सांभाळणाऱ्या महिलाही अजून पोलिसांच्या हाती आलेल्या नाहीत.महामंडलेश्वर१००८ पदवी मिळाली तरी कोठून?विविध धार्मिक यात्रांमध्ये पूजाविधीचे देखावे करणे, जमलेल्या भक्तांवर आसूड ओढणे आणि भक्तीचा आव आणत भोंदूगिरीचे कृत्य चालविणारा हा स्वयंघोषित कथित महामंडलेश्वर गणेशानंदगिरी महाराज सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहे. लवकरच त्याचा ताबा सातपूर पोलिसांकडून घेतला जाणार आहे. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी