पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा, लौकी शिरसगाव परिसरात शुक्रवारपासून (दि. २८) पेट्रोल-डिझेल व हायड्रोकार्बनचे साठे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. सकाळपासून ही यंत्रणा परिसरातील पाटोदा पठाण नाला, लौकी, शिरसगाव, जऊळके, निळखेडे आदी भागात शोध मोहीम राबवित आहे. दिवसभरात ही यंत्रणा सुमारे वीस किलोमीटर अंतराच्या लांबीत शेकडो ठिकाणी बोअरवेल घेत असून, या बोरवेलच्या खड्ड्यात स्फोट घडवले जात आहे. या भागात इंधन सर्वेक्षण करणारी यंत्रणा दाखल झाली असल्याने ही यंत्रणा पाहण्यासाठी तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ कुतूहलापोटी गर्दी करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ही शोध मोहीम राबविली जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी हायड्रोकार्बनचे साठे आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी हायड्रोकार्बन इंधन सर्वेक्षणास राज्यातील जालना येथून सुरु वात झाली आहे. ही शोध यंत्रणा येवला तालुक्यातील पाटोदा व लौकी शिवारात लवाजम्यासह दाखल झाली आहे. परिसरातील मुरमी, सोमठाणदेश, कातरणी, नीळखेडे, लौकी शिरसगाव, जऊळके, देशमाने व परिसरातील गावांमध्ये ही शोध मोहीम राबविणार आहे.शुक्र वारी ही यंत्रणा परिसरात दाखल झाली आहे. सेन्सरद्वारे जमिनीचे परीक्षण करून त्या ठिकाणी बोअरवेल घेतले जाते. नंतर त्या बोअरवेलमध्ये स्फोट घडवून भूगार्भाचे नमुने घेतले जातात. व त्यानंतर या भागात इंधन साठे आहे की नाही याचा शोध घेतला जाणार आहे. या परिसरात किती फुटांपर्यंत बोअरवेलचे खोदकाम करावयाचे याचा आराखडा यंत्रणेकडे उपलब्ध असून, लौकी शिरसगाव या भागात पंच्याहत्तर फूट खोल बोअरवेल घेतले जात आहे.येवला तालुक्यात यापूर्वीही अशी शोध यंत्रणा येऊन त्यांनी याच परिसरातील निळखेडे, मुरमी, कातरणी, आडगाव रेपाळ, विखरणी येथे शोध घेऊन चाचणी घेतली होती. पुन्हा याच भागात शोध मोहीम राबविली जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.२५ ट्रॅक्टरसह मोठ्या बोअरवेल गाड्याच्ओएनजीसी कंपनीच्या वतीने हे हायड्रो इंधन सर्वेक्षण सुरू आहे. या कंपनीचे सुमारे ५०० ते ७००० कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी झालेले आहे. त्यांच्याकडे जमिनीत बोअरवेल घेण्यासाठीचे सुमारे २५ ट्रॅक्टर तसेच मोठ्या बोरवेल गाड्यांचा ताफा आहे. प्रत्येक ट्रॅक्टरसाठी दिवसाकाठी जमिनीत सरासरी १०० फूट खोलीचे बोअरवेल घेऊन चाचपणी करण्यात येत आहे.
पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन इंधनाची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 1:12 AM