सिन्नर : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी निघणाऱ्या पालखी परिक्रमेचे सिन्नर येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.जन्मेजय विजयसिंह राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टच्या वतीने सुरू झालेल्या परिक्रमेचे यंदाचे २२वे वर्ष आहे. शशिकांत, सौरभ, विलासिनी आणि स्वरा मालपाठक यांच्या पुढाकाराने सिन्नरचा पालखी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. पडकी वेस येथे पालखीचे वाद्यांच्या गजरात व जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक प्रमोद चोथवे, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोरडे, बंडोपंत मालपाठक, डॉ. संजय रत्नाकर, एचडीएफसी बॅँक शाखेचे शाखा व्यवस्थापक विशाल हरिदास, सुनील देशपांडे, विलास देशपांडे, हेमंत मालपाठक, सुहास कुलकर्णी, पीयूष रत्नाकर, संजय बर्वे, सुधीर रत्नाकर आदी पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. चौकाचौकांत सुहासिनींनी औक्षण करून पूजा केली. वैद्य गल्लीतून मालपाठक यांच्या निवासस्थानी सौरभ व स्वरा मालपाठक, ऐश्वर्या व दर्शन मालपाठक यांनी पालकीची मुख्य पूजा केली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चव्हाणके यांच्या जागेत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
जयघोष : सिन्नरला चौकाचौकांत सुहासिनींकडून औक्षण; शहरातून मिरवणूक स्वामी समर्थ पालखीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:36 AM
सिन्नर : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी निघणाऱ्या पालखी परिक्रमेचे सिन्नर येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देपरिक्रमेचे यंदाचे २२वे वर्ष जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात स्वागत