नाशिक : ‘मैं पल दो पल का शायर’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘जो वादा किया... ’ यांसारख्या एकाहून एक सरस गीतांनी रसिकांना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात नेऊन ठेवले... निमित्त होते ‘स्वररचना’ प्रस्तुत ‘साहिर... शायर पल का’ मैफलीचे...प्रख्यात कवी, गीतकार साहिर लुधियानवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुसुमाग्रज स्मारक येथे आज सायंकाळी ही मैफल रंगली. मैफलीत मृणाली मालपाठक, विवेक केळकर व अनिरुद्ध कुर्तडीकर यांनी साहिर यांची गाजलेली सदाबहार गीते गायली. अभी न जाओ छोडकर, जीवन के सफर में राही, जुर्मे उल्फत पे हमें, मैं जिंदगी का साथ निभाता, तत्बीर से बिगडी हुई, चलो एक बार फिरसे यांसह साहिर लुधियानवी यांची पंचवीस गीते यावेळी पेश करण्यात आली. गायकांना प्रमोद पवार (संवादिनी), अमोल पाळेकर (तबला), फारुख पीरजादे (आॅक्टोपॅड), रागेश्री धुमाळ (की-बोर्ड), कृष्णप्रसाद अय्यंगार (गितार) यांनी संगीतसाथ केली. श्रीपाद कोतवाल यांनी निवेदन केले. ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी पराग जोशी यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)
मैं पल दो पल का शायर...
By admin | Published: October 25, 2015 11:26 PM