नाशिक- सांगली येथे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीवर हल्ला करून मराठ्यांच्या नादी लागू नकोस, छगन भुजबळ यांच्या सारखीच माघार घे अशा आशयाचे पत्रक चिटकवण्यात आले. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी त्याचा निषेध केला असून आपण महायुतीतील उमेदवारीचा गोंधळ टाळण्यासाठी माघार घेतली आहे, कोणाला घाबरून नव्हे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्यामुळे महाराष्ट्रभर सभा घ्याव्या लागत आहेत, त्याची खिल्ली भुजबळ उडाली, जरांगे हा देशाचा मोठा नेता आहे. बेडकासारखे फुगवून ते बोलतात असे ते म्हणाले. आज सकाळी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीवरील हल्ला प्रकरणी चिंता व्यक्त करताना पोलीसांनी याची गंभीर दखल घ्यावी असे ते म्हणाले. उमेदवार कोणी असे करत नाही, मात्र उत्साही कार्यकर्ते असे करू शकतात. मात्र, ते अयोग्य असल्याचे भुजबळ म्हणाले.
प्रकाश शेंडगे ओबीसी चळवळीतील नेते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याांच्या संविधानाने मताचा अधिकार प्रत्येकाला दिला तसा उमेदवारीचा देखील दिला आहे. तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मात्र मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये येऊन ही जागा ओबीसींची नाही असे सागंत आहे. मुळात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण नाही, त्यामुळे ते खुल्या गटात लढु शकात. मात्र, जरांगे पाटील यांना काहीच कळत नसल्याने ते असे बोलतात, अशी टीका भुजबळ यांनी केली.