देवळा/लोहोणेर : लोहोणेर येथून गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर विठेवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी पकडले असून, याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या विठेवाडी ग्रामस्थांसमोर दोन अधिकाºयांमध्ये तू तू मैं मैं झाल्याने तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. शुक्रवारी (दि.२९) सकाळी सहा वाजता देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील दत्त मंदिराजवळ वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर अवैधरीत्या वाहतूक करत असतांना विठेवाडी येथील ग्रामस्थांनी पकडले. लोहोणेर गावातील हे ट्रॅक्टर ग्रामस्थांनी गावात आणले व सदरची बाब तहसीलदार व पोलीस निरीक्षक देवळा यांना दूरध्वनीवरून कळवली. या दरम्यान लोहोणेर येथील ट्रॅक्टर मालकाने विठेवाडी ग्रामस्थांना दमदाटी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांचा उद्रेक पाहून वाळू तस्करांनी तेथून काढता पाय घेतला.यावेळी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे तत्काळ विठेवाडी येथे हजर झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी ग्रामस्थांची समजूत घातली व त्यांना तक्र ार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले. गौण खनिज महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने लोहोणेरचे मंडल अधिकारी आर. डी. परदेशी यांना ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस निरीक्षक पाटील यांनी मंडल अधिकारी परदेशी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले असता त्यांच्यात वादविवाद झाला. ‘तुम्ही माझे अधिकारी नाहीत, तहसीलदार सांगतील तेव्हा मी तक्र ार देईन, तुम्हाला काय करायचे ते करा, अशा प्रकारे उर्मटपणे उत्तर देऊन तक्रार दाखल न करता ते पोलीस ठाण्यातून निघून गेले. यावेळी पोलिस निरीक्षक पाटील यांच्या दालनात विठेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. मंडल अधिकाºयाची ही अरेरावी व बेजबाबदारपणा पाहून सर्वजण अवाक् झाले. दरम्यान, काही वेळेनंतर मंडल अधिकारी आर. डी. परदेशी यांनी ट्रॅक्टर मालक भैय्या मिरच्या व त्याचे दोन साथीदारांविरु द्ध पर्यावरण कायदा कलम ३ व १५ प्रमाणे व अवैध वाळू चोरी गुन्हा कायदा कलम ३८९ अन्वये देवळा पोलिसांत फिर्याद दिली असून, अवैध वाळू वाहतुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी विलास निकम, शशिकांत निकम, शिवाजी निकम, राजेंद्र निकम, प्रवीण निकम, तानाजी निकम, दिनेश निकम, ईश्वर निकम, भिला निकम, सतीश निकम, रावसाहेब निकम, योगेश अहेर, विलास पवार, मनोज अहेर, कल्पेश अहेर, महेंद्र अहेर, काशिनाथ बोरसे, जिभाऊ अहेर आदींसह विठेवाडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.मंडल अधिकारी परदेशी यांना घडलेल्या घटनेची तक्रर देण्याविषयी सांगितले असता त्यांनी अरेरावीची वर्तणूक केली. यासंदर्भात पोलीस डायरीत नोंद केली असून, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्र ार करणार आहे.- गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक, देवळागौण खनिज कायद्यान्वये कोणताही गुन्हा दाखल करण्यापूर्वी तहसीलदार पत्र देतात. त्या पत्रातील जावक क्रमांक फिर्यादीत नोंदवावा लागतो. मला जोपर्यंत तहसीलदारांचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत मी तक्रार कशी देणार? पत्र मिळाल्यावर तक्रार दिली.- आर. डी. परदेशी, मंडल अधिकारी, लोहोणेर
तक्रार नोंदविण्यावरून अधिकाऱ्यांत तू तू मैं मैं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:10 AM