नाशिक : कलाकार व पे्रक्षक यांच्या जीवलग नात्यावर प्रकाश टाकत एखादा प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारावर किती सत्य प्रेम करतो याची कहानी ‘हम तो तेरे आशिक है’ या नाटाकातून दाखविण्यात आली आहे़ कामगार कल्याण विभागाचा नाट्यमहोत्सव महाकवी कालिदास कलामंदिरात सुरू आहे. या महोत्सवात आज सातपूर येथील कामगार कल्याण भवनच्या वतीने संजय मोने लिखित व किरण चव्हाण दिग्दर्शित ‘हम तो तेरे आशिक है’ हे नाटक सादर करण्यात आले़ यामध्ये एक हौशी प्रेक्षक त्याला आवडणाऱ्या अभिनेत्रीवर मनोमन खूप प्रेम करत असतो़ तिच्या प्रत्येक नाटकाला त्याची हजेरी असणारच, नाटकाच्या अखेरीस तिला भेटण्याचा प्रयत्न, सही घेण्याचा प्रयत्न त्याचे असायचे़ तर ती किती सुंदर आहे, तिचा अभिनय किती सुंदर आहे याचे गुणगाण सतत पत्नीजवळ तो करत असतो़ आपला पती मनोमन का होईना आपल्यापेक्षाही त्या अभिनेत्रीवर खूप प्रेम करतो याची जाणीव पत्नीला असते़ अभिनेत्री मात्र त्याच्याकडे इतर प्रेक्षकांप्रमाणेच पाहत असते़ संपूर्ण आयुष्यात खोट्या प्रेमाचे धोके बसलेल्या या अभिनेत्रीचे अखेरचे दिवस हालाखित असतानाही हा प्रेक्षक तिच्याप्रती प्रेम दाखवत असतो़ अखेरीस एक दिवस तो तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली देतो़ तर आयुष्यभर ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या अभिनेत्रीला प्रेक्षकाचे सत्य प्रेम काय असते आणि ते किती मनापासून प्रेम करतात याचा अनुभव येऊन गहिवरून येते़
‘हम तो तेरे आशिक है’ मधून कलाकार व प्रेक्षकाच्या प्रेमाची बाजू
By admin | Published: January 14, 2015 1:07 AM