शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच - शरद पवार

By admin | Published: January 05, 2017 4:35 PM

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 5 - मोदींनी माझे बोट धरून राजकारणात आल्याचं म्हटलं, त्यांचे हे कौतुकास्पद उद्गार  ऐकून मी ...

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 5 - मोदींनी माझे बोट धरून राजकारणात आल्याचं म्हटलं, त्यांचे हे कौतुकास्पद उद्गार  ऐकून मी मेलोच, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोलेबाजी केली. मोदी बोलायला फारच हुशार असल्याचं म्हणत पवारांनी मोदींवर उपरोधिक टीकाही केली. नाशिकमधील पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवारांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करून खिल्लीही उडविण्याचा प्रयत्न केला. पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणादरम्यान मोदींनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली होती. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी ही टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपाचा मित्रपक्ष आणि सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेकडून नोटाबंदीबाबत सातत्याने होणारी टीका, नोटाबंदीचा शेतक-यांवर होणार परिणाम यावरही भाष्य केले.56 इंचाची छाती असलेल्या माणसाने घेतलेल्या निर्णयामुळे पहिले लोक खूश होते, मात्र त्यानंतर त्यांना रांगेत उभे राहावे लागले. संसदेतल्या बँकेतही पैसे नसल्यानं 24 हजारांचा चेकही देण्यात आला. मात्र फक्त 10 हजार रुपयेच हाती आले, असेही शरद पवार म्हणाले आहेत. भाजपाचे खासदार मोदींना खूप घाबरत असून, खासगीत मला मोदींना समजवायला सांगत असल्याचाही गौप्यस्फोट यावेळी पवारांनी केला आहे. नोटाबंदीमुळे माझी 2 एकरांवरील वांगी मातीमोल झाल्यानं त्यावर मला पुन्हा ट्रॅक्टर घालावा लागला. कांदा, टोमॅटोसह इतरही शेतमालाचे भाव घसरले, असंही त्यांनी टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही सहकारी बँकेत जमा झालेले 8 हजार 600 कोटी कोणी स्वीकारत नसल्याचंही पवार म्हणाले आहेत.

नोटाबंदीवरून मोदींवर सोडले टीकास्त्र

 जेव्हा मूठभर लोक देशाचा निर्णय घेऊ लागतात तेव्हा त्यात देशहित सामावलेले नसते. अशावेळी होणारे निर्णय अराजक असतात. देश सध्या अशाच प्रकारे अराजकतेकडे वाटचाल करीत असल्याची टीका पवार यांनी केली. नोटाबंदीमूळे शेतकरी आणि कष्टकरी उध्वस्त झाले आहेत, जनता सर्व लक्षात ठेवते आणि योग्य वेळी निर्णय घेते. आणीबाणी नंतर जनतेने इंदिरा गांधी यांना पराभूत केले होते याचे स्मरण पवार यांनी करून दिले. 

https://www.dailymotion.com/video/x844nce