शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

‘अशी मी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: March 10, 2016 11:08 PM

नावीन्यपूर्ण अनुभूती : एकापेक्षा एक सरस ठरण्यासाठी सखींनी अनुभवला आगळावेगळा उपक्रम

 नाशिक : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील कर्तृत्ववान सखींचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने उपस्थित सखींसाठी ‘अशी मी’ नावाची आगळीवेगळी स्पर्धा घेऊन विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मालेगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी मंच सदस्यांसाठी ‘अशी मी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सखी सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कार्यक्रम येथील बालगंधर्व मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. बाबुजी तथा जवाहरलालजी दर्डा व गणेश प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वेदांत एन्टरप्राईजचे संचालक योगेश भोकरे, समर्थ एज्युकॉम्प प्रा. लि. चे अध्यक्ष सुनील निकम व अनुप्रिता निकम तर परीक्षक म्हणून निवृत्त मुख्याध्यापक संजय पाठक, अमृता कुंभकर्ण, शिक्षक मीनल प्रभुणे यांनी काम पाहिले. यावेळी घेण्यात आलेल्या ‘अशी मी’ या स्पर्धेत भाग घेतलेल्या सखी सदस्यांमध्ये मंगला विजय भावसार, पुष्पा देवीदास साळुंके, सौ. शामल राजेंद्र सुरते, वर्षा रमेश गोधा, योगिता प्रकाश जाधव, वैशाली शेवाळे, मनीषा संजय बागड, मीनाक्षी भावसार, सीमा विकास इंदोरकर, संगीता उन्मेष माहेश्वरी, ज्योती मुसळे विजेता ठरल्या. यावेळी उपस्थित सखी सदस्यांमधून ११ विजेत्यांची नावे काढण्यात आली. यामध्ये प्रियंका विजय पहाडे, अलका गुमाडे, भावना सोनजे, प्रज्ञा कुंभारे, रजनी जाधव, वैशाली शिरोडे, कल्पना नेरकर, शामल सुरते, सुकेशा बडजाते, संगीता गढरी विजेत्या ठरल्या. उपस्थितांमधील ११ विजेत्यांचा व स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवर परीक्षक व सन्मानार्थी सखींच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली. सटाणा : सखीमंच आयोजित ‘अशी मी’ स्पर्धेचे राधाई मंगल कार्यालयात संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार व सौ. नेहा पोतदार, नगरसेवक राजेंद्र बाळकृष्ण अलई व सौ. सुवर्णा अलई तर परीक्षक म्हणून बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या उपशिक्षिका सौ. सुचिता ह्याळीज व मनिषा अहिरे यांनी काम पाहिले. प्रमुख अतिथी व परीक्षक यांचा प्रतिष्ठीत शेतकरी कृष्णा धर्मा भामरे, प्राध्यापक व कवी शं. क. कापडणीस, प्रा. बी. डी. बोरसे, व्यापारी प्रदिप सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या ‘अशी मी’ या स्पर्धेत भाग घेतलेल्या सखी सदस्यांमध्ये सुरेखा तरटे, दिपा भाटिया, रूपाली जाधव, अर्चना सोनार, मालती चव्हाण, रूचिरा पगारे, सुवर्णा येवला, मिनाक्षी जाधव, रूपाली देवरे, सुलभा कुलकर्णी, संगीता खैरनार यांनी सखी सदस्यांच्या या स्पर्धेत दाखवून दिले की, महिलांना संधी मिळाल्यास नक्कीच संधीचे सोने करतात. यावेळी उपस्थित सखी सदस्यांमधून ११ विजेत्यांची बक्षीसे काढण्यात आली. यामध्ये सुनिता खैरनार, संगीता शेवाळे, सविता अहिरराव, अर्चना सोनार, रंजना अमृतकर, सुवर्णा येवला, धनश्री निकम, अलका अमृतकर, रूपाली निकुंभ, किरण जैन, सेजल येवला विजेत्या ठरल्या. उपस्थितांमधील ११ विजेत्यांना बक्षीसे वाटप करण्यात आली. सूत्रसंचालन सारंग पाटील तर आभार आशिष मोरे यांनी केले.कळवण : येथील कळवण मर्चंट बँक सभागृहात ‘अशी मी’ स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सहभागी स्पर्धकांमधून अकरा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर उपस्थितांमधूनच ११ भाग्यवंत सखींची लकी ड्रॉद्वारे निवड करून त्यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार ,नगराध्यक्ष सुनिता पगार, मीनाक्षी पवार, सुनिता सुधाकर पगार, प्राचार्य डॉ. उषाताई शिंदे , सुचिता रौंदळ, शकुंतला मालपुरे, निर्मला संचेती, सौ निशा वालखडे , डॉ. ज्योती सोनवणे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक वितरण व्यवस्थापक पंकेश चंद्रात्रे यांनी केलेनांदगाव : येथील ओसवाल भुवनमध्ये आयोजित ‘अशी मी’ स्पर्धेत ११ सदस्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये माधुरी सुराणा, सारिका पाटणी, कांचन गुप्ता, श्वेता गुप्ता, राधिका फोफलिया, मोना गुप्ता, कांता फोफलिया, सोनल दुगड, सुनीता काकळीज, पंकजा चांडक, शकुंतला काला यांचा समावेश होता.उर्वरित सदस्यांमधून ११ सदस्यांसाठी लकी ड्रॉ कुपन स्पर्धा आयोजित केली होती. त्यामधील विजेत्यांची नावे साधना काला, सारिका पाटणी, मेधा घोंगाणे, मेघा वाघ, सुजाता तल्हार, हर्षला पाटील, सुनीता आहेर, कंचन गुप्ता, सुरेखा घोंगाणे, प्रियंका आहेर, शकुंतला काला.मनमाड: येथील आठवडे बाजारातील बालाजी मंदिरात ‘अशी मी’ स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका अलका महाजन, भारती लोढा, उज्वला परदेशी, मनिषा अग्रवाल,हेमलता दराडे या उपस्थित होत्या. यावेळी आयोजित ‘अशी मी’ स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक निलिमा कुलकर्णी,संगिता कदम, सिमा कुलकर्णी,कल्पना हिंगमिरे, पुनम परदेशी, किर्ती अग्रवाल ,सोनिया अग्रवाल,विद्या जगताप, सुनिता गवांदे,अनिता शाकद्वीपी, निलिमा डोंगरे यांना पारितोषीक देण्यात आले. उपस्थित सखींपैकी केंद्रनिहाय ११ भाग्यवंत सखींचा पारितोषीक देउन गौरव करण्यात आला. यामध्ये निलीमा डोंगरे, सोनिया अग्रवाल, छाया राठोड, उज्वला परदेशी, प्रिती परदेशी,धनश्री अहिरे,संगिता कदम, वैशाली पाटील,मनिषा अग्रवाल, अर्चना पारीक, रत्ना नागरे या सखींचा समावेश होता. घोटी: येथे लोकमत सखीमंच आयोजीत अशी मी कार्यक्रम मोठ्या उत्साहात गोठी कॉम्प्लेक्स हॉल येथे पार पडला. जागतीक महीला दिनाचे औचीत्य साधुन आयोजीक कार्यक्रमात ४० महीलांनी सहभाग घेऊन मी कशी ही याचे सादरीकरण या ठीकाणी महीलांनी केले. दैनंदीन धकाधकीच्या जीवनात आपले मत व्यक्त करण्यासाठी आपणास हक्काचे व्यासपीठ हवे असते ते आपणास सखी मंच च्या माध्यमातुन उपलब्ध करूण दिले असल्याचे मत लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी याप्रसंगी व्यक्त केले. इगतपुरीच्या नायब तहसीलदार संघमित्रा बावीस्कर अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव व उद्योजक महावीर गोठी हे उपस्थित होते. येवला: लोकमत सखी मंचच्या वतीने येथील लक्ष्मीनारायण मंदिर हॉलमध्ये ‘अशी मी’ या विषयावर घेण्यात आली. या स्पर्धकांपैकी अनेक सखींनी आपल्या जीवनातील वास्तव खुलेपणाने मांडले. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या संगीता कैलास काबरा, शलाका देखणे, रेखा माधव साबळे ,नीलिमा अट्टल, सुषमा शैलेश पटणी, संगीता दिवटे, सरोज राजेंद्र तिवारी, प्रमिला सुभाष बागडे, कीर्ती योगेश सोनवणे, कमल बिडवे, रतन गंगाधर नाकोड, यांना पारितोषिके मिळाली. स्पर्धेचे परीक्षण माजी नगरसेविका प्रतिभा पंकज पारख ,पुष्पा गुप्ता यांनी केले. याशिवाय उपस्थित सखी सभासदांमधून ११ भाग्यवंत लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यांना जाहिरात प्राप्ती व्यवस्थापक उमेश मुंदडा यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. भाग्यवंत सखींमध्ये शुभांगी पटणी, रेखा छातानी, शबाना मोहम्मद शेख, सुनिता शिंदे, शांताबाई दिघे, रंजना प्रेमचंद पहिलवान, स्नेहल चंडालिया, टीना गुजराथी, अनिता जाधव,छाया नागपुरे, राजश्री दिवटे यांचा समावेश आहे. प्रास्तविक निलेश मुंदडा यांनी केले. इगतपुरी : येथे अशी मी स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष जनाबाई खातळे उपस्थित होत्या. थोर पुरुषांना जन्म देणाऱ्या महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या मुलांवर संस्कार करायला हवेत. विकासाची दोरी ही महिलांच्या हातात आहे. .देश सक्षम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन खातळे यांनी केले .यावेळी अशी मी या स्पर्धेत सरला कोचर , सुरेखा रावत , सुजलबाई राठी , सपना चोपडा, वैशाली नागरे,तृप्ती लुणावत, सुनंदा पार्टे, रूपाली गायकवाड, श्रुती सेठी, राजश्री चांडक, राखी मुथा महिला स्पर्धेच्या विजेता ठरल्या त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.सूत्रसंचलन शाम जाधव यांनी केले .सिन्नर : जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अशी मी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, पंचायत समितीच्या सभापती संगिता काटे, दीप्ती राजाभाऊ वाजे, नगरसेवक डॉ. प्रतिभा गारे, मधुबाला कटारिया, सरकारी वकील नीलिमा देशमुख, बस स्थानक प्रमुख सौ. सविता काळे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त येथील पंचवटी मोटेल्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महिलांसाठी ‘अशी मी’ ही अगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. आपण सर्वांहून कशा सरस, वेगळ्या व दक्ष आहोत हे फक्त एका मिनिटात सांगण्यासाठी सुमारे ४० महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.या स्पर्धेत ११ सखी विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत विद्या सपकाळ, अंजली पाठक, वंदना तुपे, सीमा वाघ, श्रध्दा गुजराथी, वैशाली चतुर, चित्रा क्षत्रिय, हेमांगी कुलकर्णी, मनिषा आणेराव, कल्पना रेवगडे व रुपा तुपे यांनी यश मिळविले. या यशस्वी महिलांना लोकमत तर्फे पारितोषिक वितरीत करण्यात आले. परीक्षक म्हणून सौ. सोनल दिलीप बिन्नर व सौ. सविता शांताराम देशमुख यांनी काम पाहिले.उपस्थितीत महिलांमधून ११ भाग्यवंत सखींना बक्षीसे जिंकण्याची संधी मिळाली. भाग्यवंत सोडत मध्ये सौ. सविता मुत्रक, प्रतिभा मुत्रक, ज्योती वाघ, शीतल पन्हाळे, प्रतीक्षा कुलकर्णी, कांजन पाटसकर, जयश्री भंडारे, सारीका सांगळे, विजया देशमुख, सुनिता दातरंगे, मनिषा भोरकडे यांना पारितोषिके मिळाली. सूत्रसंचालन कृष्णा वावधाने यांनी केले. गणेश पगार यांनी आभार मानले.हरसुल: येथे ‘अशी मी’ स्पर्धा घेण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे सौ साळुंखे सौ सुरेखा साबळे सौ तायडे ह्या उपस्तीत होत्या . अशी मी या स्पर्धेलाउत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत शरयु पावन खर्डीकर गीतांजली पुंडलिक कोरडे,पूजा विनोद अडेप ,कल्पना संजय पाटील ,अल्म्श मुस्द्दिक शेख ,मीरा हरिदास अवतार ,अर्चना संजय बागडे ,चितरा मिलिंद वाघचौरे,हेमलता भगवान हिरकुड ,सोफिया मुशाद सय्यद ,कविता हरिदास महाले या महिला विजेत्या ठरल्या. (लोकमत चमू)