शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

महिलांच्या आरोग्यासाठी कार्यरत आयएमए महिला विंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:52 AM

परिचय महिला संस्थांचाडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या शाखा देशभर आहेत. त्यात महिला डॉक्टरही असतात. पण शहरातील महिला डॉक्टरांची वाढती संख्या, निरनिराळे उपक्रम राबविण्याचा त्यांचा हुरूप पाहता आयएमए महिला विंगची दोन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये स्थापना करण्यात आली. आयएमए सदस्य महिला डॉक्टर या विंगच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन व्यग्र रुटिनमधून, कौटुंबिक जबाबदाºयांमधून वेळ ...

परिचय महिला संस्थांचाडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या शाखा देशभर आहेत. त्यात महिला डॉक्टरही असतात. पण शहरातील महिला डॉक्टरांची वाढती संख्या, निरनिराळे उपक्रम राबविण्याचा त्यांचा हुरूप पाहता आयएमए महिला विंगची दोन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये स्थापना करण्यात आली. आयएमए सदस्य महिला डॉक्टर या विंगच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन व्यग्र रुटिनमधून, कौटुंबिक जबाबदाºयांमधून वेळ काढून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देतात. यातून समाजासाठी काहीतरी करत असल्याचे समाधान आणि गरजूंना उपयोगी पडण्याचे सत्कर्म अशा अनेक गोष्टी साध्य होत असल्याने विंगच्या सदस्या नेहमीच निरनिराळे उपक्रम राबविण्याचे नियोजन करताना दिसतात.मागील वर्षापासून आयएमए महिला विंगतर्फे तेजस्विनी प्रोजेक्ट राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान, वैद्यकीय तपासणी, प्रात्यक्षिके आदी विविध उपक्रम राबविले जातात. शासकीय कन्या शाळा, आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील मुली, शहराबरोबरच ग्रामीण भागातील आश्रमशाळांमधील मुलींसाठी या प्रकल्पांतर्गत आजवर शरीरओळख, एचबी तपासणी, एचबी वाढविण्याचे उपाय, अ‍ॅनिमियाचे दुष्परिणाम, रक्तगट तपासणी, मासिक पाळीसंबंधी माहिती, चांगले-वाईट स्पर्श, गर्भधारणा, त्वचा व केसांची काळजी आदी विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय विंगतर्फे परिचारिका दिनी परिचारिकांचा सत्कार, सुदृढ बालक स्पर्धा, महिला डॉक्टरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, झुंबा कार्यशाळा, योगासन वर्ग, हास्ययोग, अक्वा झुंबा, गरबा कार्यशाळा, शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा, मोनोपॉझ कार्यशाळा आदी उपक्रम राबविण्यात आले. डॉक्टर हा नेहमी या ना त्या कारणांनी मग्न असतो. त्याला स्वत:साठी वेळ मिळावा, निसर्गाच्या सान्निध्यात जाता यावे यासाठी शहराच्या जवळपासच्या डोंगरांवर ट्रेकिंग कॅम्पही आयोजित केले जातात. विंगमध्ये सध्या डॉ. राजश्री पाटील, डॉ. कविता गाडेकर, डॉ. सुषमा दुगड, डॉ. प्राजक्ता लेले यांच्यासह अनेक महिला डॉक्टर सक्रिय सहभाग देत आहेत.