नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची ३२ पदे रिक्त झाली असून, या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्याही सदस्यांची पदे रिक्त असल्याने त्यावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांच्या लॉबिंग सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची गेल्या आठवड्यात व त्यापाठोपाठ विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची नियुक्ती झाली. तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी अश्विनी आहेर, समाजकल्याण सभापतिपदी सुशीला मेंगाळ या दोघांची तर अन्य दोन विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी संजय बनकर व सुरेखा दराडे यांचीही निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष गायकवाड यांच्यासह बनकर व दराडे या तिघांना विषय समित्यांचे वाटप या विशेष सभेत केले जाणार आहे. उपाध्यक्ष गायकवाड यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन तर संजय बनकर यांच्याकडे अर्थ, बांधकाम समिती दिली जाण्याची शक्यता आहे. सुरेखा दराडे यांना शिक्षण समिती दिली जाईल.पदाधिकाऱ्यांच्या समित्या वाटपानंतर जिल्हा परिषदेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या दोन जागांवरही सदस्यांची वर्णी लागणार आहे. स्थायी समितीचे सदस्य असलेले बाळासाहेब क्षीरसागर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले असून, राष्टÑवादीच्या कोट्यातील डॉ. भारती पवार यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिल्याने त्यांचीही जागा रिक्त आहे. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी सेना व राष्टÑवादीच्या इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे. ज्या सदस्यांना पदाधिकारी निवडीत डावलण्यात आले, त्यांची नावे यासाठी घेतली जात आहेत.बांधकामसाठी राष्टÑवादी, कॉँग्रेस, सेनेत चढाओढबांधकाम समितीचे सदस्य असलेले संजय बनकर, अश्विनी आहेर, सुरेखा दराडे या तिघांची विषय समिती सभापतिपदी निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागांसाठीही राष्टÑवादी, कॉँग्रेस व सेनेत चढाओढ सुरू झाली आहे. जलव्यवस्थापन समितीचे दोन, कृषी समितीचे सहा, समाजकल्याण समितीचे दोन, शिक्षण समितीवर एक, अर्थ समितीवर पाच व पशुसंवर्धन समितीवर तीन व महिला आणि बालकल्याण समितीवर दोन सदस्यांची पदे रिक्त आहेत. या समित्यांवर विशेष करून महाविकास आघाडीच्या सदस्यांचीच सर्वाधिक वर्णी लागणार असून, भाजपच्या संख्येबळाच्या तुलनेत काही सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
३२ रिक्त जागांसाठी इच्छुकांच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:23 AM
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची ३२ पदे रिक्त झाली असून, या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्याही सदस्यांची पदे रिक्त असल्याने त्यावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांच्या लॉबिंग सुरू झाल्या आहेत.
ठळक मुद्देजिल्हा परिषद विषय समित्या : स्थायीसह अन्य समित्यांवर होणार नेमणूक