नाशिक : पेठ शहरातील आय.डी.बी.आय. बॅँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पेठ पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातून ताब्यात घेत गजाआड केले आहे.पेठ शहरात गुरुवारी (दि.२७) रात्री दोघांनी आयडीबीआय बॅँकेचे एटीएम मशिन हातोडी व स्क्रू ड्रायव्हरने फोडून रोख रक्कम चोरुन नेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेबाबत बॅँकेचे शाखा व्यवस्थापक किरण विभांडिक यांनी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पेठ पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला. खबºयाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे नासर्डी पूल परिसरात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून राजेश बाळू खाणे (२८) रा. आंबेडकरवाडी, नासर्डीपूल यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा साथीदार अंबादास हिरामण पवार उर्फ बंद-या (२८) आंबेडकरवाडी, बोधलेनगर नाशिक याचेसह एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी पवार यासही ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गाडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप कहाळे, रामभाऊ मुंढे, हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, वसंत खांडवी, जे.के. सूर्यवंशी, भूषण रानडे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, संदीप लगड, पेठ पोलिस ठाण्याचे भाऊसाहेब उगले, दिलीप रहिरे, विजय भोये यांनी ही कामगिरी बजावली.पवार सराईत गुन्हेगारपथकाने दोघांना अटक करुन त्यांना पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यातील आरोपी अंबादास पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध नाशिक शहरांतील पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पेठमधील आयडीबीआयचे एटीएम फोडणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 6:18 PM
पथकाची कारवाई : सीसीटीव्ही फूटेजवरून तपास
ठळक मुद्देअंबादास पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध नाशिक शहरांतील पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत