संदीप भालेराव / नाशिक: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी वास्तव्यास असलेल्या गावातील ग्रामसेवकामार्फत ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण देविदास नांदगावकर यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा २१ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ऊसतोड कामगारांना ग्रामसेवकांमार्फत ओळखपत्र प्रदान करण्याच्या सूचना आहेत.
जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून ऊसतोड कामगारांनी ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत तेथील ग्रामसेवकांमार्फत ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या ऊसतोड कामगारांनी याबाबत नोंदणी करून ओळखपत्र घेतलेले नसल्यास त्यांनी तत्काळ संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.