अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या बेवारस विविध गुन्ह्यांतील सोळा दुचाकी वाहने त्याच्या मालकांनी कागदपत्रासह ओळख पटवून घेऊन जावीत, अन्यथा योग्य ती सरकारी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने तसेच वाहनांचे मूळ मालक सापडत नसल्याने बकाल अवस्थेतील वाहनांमुळे पोलीस ठाण्याला भंगार गुदामाचे स्वरूप प्राप्त होत असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने मालकांनी दुचाकीची ओळख पटवून घेऊन जावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोम्बिंग ऑपरेशन ,नाकाबंदीमध्ये पोलिसांनी १६ दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार या दुचाकी मूळ मालकांना परत करत आहोत. वाहनांची योग्य ती कागदपत्र घेऊन पोलीस ठाण्यात सादर करून मूळ मालकांनी आपली वाहने घेऊन जावे, असे माईनकर यांनी सांगितले.
---फोटो आर वर १३इंदिरानगर नावाने सेव्ह आहे.