श्री श्री रविशंकर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढावा लौकिकनाशिक : धार्मिक, राजकीय, उद्योजक आणि माध्यम या चारही स्तंभांची भूमिका परस्परविरोधी असल्याने जनमानसात या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची प्रतिमा मलीन आहे. या चौघांनी सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) पुढे आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा लौकिक वाढेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले. नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राजकारण, आध्यात्मिक, उद्योगव माध्यम या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली. या चारही क्षेत्रांत भ्रष्टाचार फोफावल्याने, जागतिक स्तरावर देश बदनाम झाला आहे. २५ वर्षांपूर्वीचा विचार केल्यास चीन भारताच्या तुलनेत अतिशय मागासलेला देश म्हणून ओळखला जात असे. आज चीनने घेतलेले भरारी जगातिकस्तरावर चिंतेचा विषय बनत आहे. वास्तविक जगाच्या कुठल्याही देशाच्या तुलनेत सार्वधिक ६० टक्के ‘फॅमिली बिझनेस’ भारतात चालतात. देशात प्रतिभावंतांचीदेखील कमी नाही. मात्र अशातही आपली पिछेहाट होत आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी आपण देशाला मागासलेपण देत आहोत. देशाच्या या स्थितीला केवळ राजकारणी किंवा उद्योगपती जबाबदार नाहीत, तर माध्यम व आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीदेखील जबाबदार आहे. एका धर्मात अंधश्रद्धा, तर दुसऱ्या धर्मात आतंकवाद असल्याने देश प्रगतीच्या आलेखापासून दूरच आहे. माध्यमेदेखील अशाच प्रकारे परस्परविरोधी भूमिका घेत असल्याने समाजात चांगल्या बाबींना दाखविणे दूरापस्त झाले आहे. जगात कुठल्याही देशात सीएसआर उपक्रम राबविले जात नाहीत. मात्र भारतात अशा प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात. कारण आपणास सामाजिक दायित्त्वाचा विसर पडला आहे. एकुणच देशाला जगतिक स्तरावर लौकीक मिळवून द्यायचा असेल तर या चारही स्तंभांनी एकत्र येऊन परस्परपूरक भूमिका घेण्याची गरज असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर उपस्थित होते.
चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे
By admin | Published: January 13, 2015 11:56 PM