ओझर : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त क्षमता दडलेल्या असतात. शिक्षकांनी त्या ओळखून मार्गदर्शन केले पाहिजे. देशाचे भविष्य या तरु ण पिढीवर अवलंबून आहे. त्यांना देशाचे सुजाण नागरिक घडविण्याचे काम करावे, असे आवाहन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी येथील नवीन इंग्रजी शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी बोलताना केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वास्तुविशारद सचिन भट्टड होते. भट्टड यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याचे व मोबाइल-टीव्ही अशा साधनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव यांनी शाळेने राबवलेल्या उपक्र मांची माहिती उपस्थिताना करून दिली. सन १९७८-७९ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विकास निधी म्हणून ११ हजार रु पयांची देणगी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन शाळेतील शिक्षक गीता दामले व गंगाधर बदादे यांनी केले. विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. ओझरचे माजी सरपंच तथा शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक योगदानातून विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. प्रमुख अतिथींचा परिचय शिक्षक उमेश कुलकर्णी यांनी करून दिला. सूत्रसंचालन किशोर कचरे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी गंगाधर बदादे यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे यांच्यासह संस्थेचे कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे, सरोजिनी तारापूरकर, रेणू कोरडे, पालक-शिक्षक संघ कार्याध्यक्ष प्रदीप आहिरे, बाळासाहेब देवरे, राजेंद्र शिंदे, नयना भट्टड आदी मान्यवर उपस्थित होते.