नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.विखे-पाटील पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारच्या कामकाजाबाबत समाजातील कोणताही घटक समाधानी नाही, उलट सरकारने आपली फसवणूक केली, अशी भावना प्रत्येक घटकात झाली आहे. कॉँग्रेसने देशपातळीवर इंधन दरवाढीचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याचा विचार करता ज्यावेळी सरकार सत्तेवर आले त्यावेळी १५० डॉलर प्रति बॅरल असलेले दर २९ डॉलरवर आले होते. त्यामुळे जनतेला ४० ते ५० रुपये दराने इंधन मिळणे अपेक्षित होते, परंतु सरकारने चढ्या दरानेच इंधनाची विक्री करून जनतेला महागाईच्या खाईत लोटले. अशा परिस्थितीत आवाज उठवू पाहणाºया समाज घटकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारच्या विरोधात बातम्या देणाºयांना ‘फेक न्यूज’ संबोधून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु देशपातळीवर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने हा कायदा तत्काळ मागे घेतला. राज्यातदेखील असाच प्रकार करण्यात आला. अंगणवाडी सेविका संपावर गेल्यावर त्यांना ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉँग्रेसने या विरुद्ध आवाज उठविल्यानंतर सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या साºया गोष्टी पाहता सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करीत असून, ज्यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध कायद्याचा आधार घेत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या अनेक घटना घडत असून, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यादेखील त्याचाच एक भाग आहे. सरकार पाठीराख्या असलेल्या सनातनसारख्या संघटनांचा अशा घटनांमध्ये सहभाग आढळून आला आहे. कॉँग्रेसने नेमक्या याच गोष्टी जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतल्याचेही विखे म्हणाले.नगर जिल्हा गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले. गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले.
सरकारकडून वैचारिक दहशतवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:36 AM
नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील : कॉँग्रेसकडून जागरसरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न