शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, 6 दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
4
Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट
5
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण
6
अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन
7
Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
8
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
9
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
11
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
12
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
13
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
14
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
15
Share Market Today : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
16
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
17
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
18
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
19
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
20
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

आडगावला ग्रामदेवतेची मूर्ती चोरीस

By admin | Published: November 23, 2015 12:07 AM

आज ग्रामसभा : चौदा किलो पितळाची महालक्ष्मी मूर्ती

पंचवटी : आडगाव येथील महालक्ष्मी चौकामध्ये असलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी थेट देवीची पितळाची मूर्तीच चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गावकऱ्यांच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. देवी मूर्तीच्या चोरीप्रकरणी आज सोमवारी (दि. २३) सकाळी ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आडगावमधील ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीची मूर्तीच चोरून नेल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरात चौदा किलो वजनाची सुमारे २५ हजार रुपये किमतीची पितळी धातूची मूर्ती होती, अशी माहिती पोलीस पाटील एकनाथ मते यांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असता गाभाऱ्यात मूर्तीच नसल्याचे निदर्शनास आले. देवीची मूर्ती चोरीस गेल्याची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच गावकरी मोठ्या संख्येने मंदिराच्या आवारात जमा झाले. घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारीही मंदिरात पोहोचले. यावेळी मंदिराची पाहणी करून तत्काळ परिसरात तपासचक्रे पोलिसांकडून फिरविण्यात आली. यावेळी जमलेल्या जमावाने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत मंदिरांमध्ये जर देवी-देवतांच्या मूर्ती सुरक्षित नसतील, तर नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करणेच गैर आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)