नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते. भात पिकविणारा शेतकरी हा मुख्यत: आदिवासी असून, त्यांना भात लागवड परवडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे शास्रोक्त लागवडीचा अभाव.उत्पादनवाढीसाठी डॉ. नारायण सावंत आणि श्रीपाद दप्तरदार यांनी राहुरी व दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या चारसूत्री भात शेतीचा अवलंब केल्यास निश्चितच भात उत्पादनात वाढ होते. शिवाय रोपही कमी प्रमाणात लागून लागवड खर्चात बचत होते, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी दिली आहे.-------------------------------------१) चारसूत्री पद्धतीत भाताच्या बियाण्याची४० ते ५० टक्केपर्यंत बचत होते. त्याच प्रमाणात रोपे तयार करणे व लावणीचा खर्च कमी होऊ शकतो. रासायनिक खताच्या खर्चातही४४ टक्के पर्यंत बचत होते.२) तणाचा त्रास कमी होतो त्यामुळे तण काढण्याच्या खर्चात बचत होते. आंतर मशागत करणे सोपे होते. पिकात हवा खेळती राहात असल्यामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.३) ५० टक्क्यांपर्यंत भाताच्या पेध्याचे वजन वाढते. फुटव्यांच्या संख्येत वाढ होते. ओबीचे वजन वाढते. आशा विविध कारणांमुळे भाताच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के उत्पादन वाढते, असे जकातदार यांनी सांगितले.-----------------प्राप्त परिस्थिती-मध्ये सुधारित जातीच्या मदतीने खताचे योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितपने भाताच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो. उत्पादकता वाढविण्यासाठी चारसूत्री पद्धतीचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. शेतकऱ्यांनी याची अंमलबाजावणी केल्यास पीक वाढेल.- अच्युत जकातदार, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, नाशिक